आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपूर्ण पश्चिम विदर्भ दुष्काळाच्या छायेत!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पश्चिम विदर्भातील तब्बल हजार १४७ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती अाहे, अशी माहिती सुधारित पैसेवारीनुसार समोर आली आहे. अमरावती विभागातील ७,२३० गावांमधील सुधारित पैसेवारीत बदल झाला अाहे. पैसेवारी ५० पैशांच्या आत असलेल्या गावांमध्ये दुष्काळ घोषित व्हावा म्हणून शासनाकडे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्रस्ताव पाठवल्याची माहिती आहे.
मागील तीन-चार वर्षांपासून पश्चिम विदर्भात नापिकी होत असून, सातत्याने या गावांमध्ये दुष्काळाचे सावट राहिले आहे. या वर्षीदेखील पावसाचे प्रमाण कमी असल्याने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा स्थितीमध्ये संपूर्ण पश्चिम विदर्भ दुष्काळाच्या छायेत असल्याचे चित्र आहे. नजर अंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त, तर सुधारित पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे. बुलडाणा जिल्ह्याची सरासरी पैसेवारी सर्वात कमी म्हणजेच ३७ एवढीच आहे. पश्चिम विदर्भातील सुधारित पैसेवारी लक्षात घेता तीव्र दुष्काळाची परिस्थिती असल्याचे निदर्शनास येते. अमरावती जिल्ह्याची नजर अंदाज पैसेवारी सरासरी ५९, बुलडाणा ५५, अकोला ५० ते ५५, वाशीम ५३, तर यवतमाळ ६७ पैशांत होती. त्यानुसार शासनाकडून विभागातील ५७ गावांमध्ये दुष्काळ घोषित केला होता.
शासनानेया वर्षी पैसेवारीच्या निकषात बदल केल्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता होती. मात्र, पैसेवारीचा निकष ५० वर करण्यात आल्याने विभागातील शेतीचे खरे वास्तव समोर आले आहे. विभागातील पाचही जिल्हा प्रशासनाकडून सुधारित पैसेवारीबाबत अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठवला आहे. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांच्याकडून ५० च्या आतील पैसेवारीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. आमदार बच्चू कडू यांनीदेखील विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढत ५० च्या आत पैसेवारी असलेल्या गावांमध्ये दुष्काळ घोषित व्हावा म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची मागणीदेखील केली. संपूर्ण विदर्भ दुष्काळग्रस्त घोषित कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. याबाबत विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाही.

अपेक्षित उपाययोजना
१) जमीन महसुलात सूट
२) सहकारी कर्जाचे पुनर्गठन
३) शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती
४) कृषिपंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट
५) शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
६) रोहयोअंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता
७) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर
८) टंचाई जाहीर केलेल्या गावांत कृषिपंपाची वीजजोडणी खंडित करणे

दुष्काळाचे निकष : पर्जन्यमान-
१)जून जुलैमध्ये एकूण सरासरीच्या ५० टक्केपेक्षा कमी पर्जन्यमान
२) मान्सून कालावधीत सरासरी ७५ टक्के कमी पर्जन्यमान
३) मान्सून कालावधीत दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ पर्जन्यखंड
लागवडी खालील क्षेत्र- एकूणलागवडीखालील क्षेत्राच्या तुलनेत झालेल्या पेरणीचे प्रमाण ५० टक्केपेक्षा कमी
सामान्य फरक वनस्पती निर्देशांक- सामान्य फरक वनस्पती निर्देशांक ०.४ किंवा त्यापेक्षा कमी
आर्द्रता- पिकांचेआर्द्रता परिणाम ५० पेक्षा कमी
पैसेवारी- दुष्काळजाहीर करण्यासाठी पीक पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्यास
अन्यनिकष- चारापरिस्थिती, पाण्याची उपलब्धता.

विभागातील सुधारित पैसेवारी
जिल्हा एकूण ५० पेक्षा ५० पेक्षा सुधारित टक्के गावे कमी जास्त
अमरावती१९८५ १९६७ निरंक १९६७ ४६
अकोला १००९ ९९७ निरंक ९९७ ४२
यवतमाळ २१५८ ९७० १०८३ २०५३ ५०
वाशीम ७९३ ७९३ निरंक ७९३ ४४
बुलडाणा १४२० १४२० निरंक १४२० ३७
एकूण ७३६५ ६१४७ १०८३ ७२३० ४४