आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Drought: Now Serious Problem Of Water bread Animals Fodder

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जनावरांच्या चारा-पाण्यासह आता भाकरीचा प्रश्नही गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- निसर्गावरिवश्वास ठेवून दरवर्षी शेतीचा जुगार खेळणाऱ्या शेतकऱ्यांना यंदाही पावसाने चांगलेच जेरीस आणले आहे. अनिश्चित पावसाने शेतकऱ्यांच्या काळजाचे ठोके वाढवले असून, उसनवारी करून शेतात पेरलेले बियाणे उत्पादनाच्या रूपात घरात येते की नाही, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन, उडीद यांसारख्या पिकांवर पडलेल्या रोगांमुळे पिकांना जबर फटका बसला आहे. भरीस भर म्हणून ज्वारीचे पीक अळीच्या प्रादुर्भावामुळे होत्याचे नव्हते होऊ लागले आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासह घरातील भाकरीची दुहेरी चिंता तालुक्यातील शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.
पावसाने दिलेल्या दग्यामुळे सोयाबीनसारख्या कमी खर्चाच्या पिकाचीही आशा मावळली आहे. जनावरांच्या चाऱ्यासह घरात भाकरीची सोय व्हावी, या दुहेरी उद्देशाने शेतकऱ्यांनी काही प्रमाणात ज्वारीचा पेरा केला. मात्र, ज्वारीवरही अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तीही संकटात आली आहे. ज्वारीवर अळी क्वचित असते. यंदा ज्वारीवर आलेली अळी पहिल्यांदा पाहत असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. कंसातील ज्वारीची पांढरी भुकटी झाली असून, धांडाही पूर्णत: अळीच्या प्रादुर्भावाने सडला आहे. सोयाबीन, उडीदवर पूर्वीच संकट आले असताना ज्वारीही हातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अचलपूर-चांदूर बाजार तालुक्यातील तोंडगाव, बेलज, बोपापूर, बोरगाव, मासोद, देवगाव, पथ्रोट, हरम, नायगाव बोर्डी, करजगाव, चमक परिसरातील ज्वारीच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

ज्वारीच्या कणसावर अळींचा प्रादुर्भाव.
शेतकऱ्यांची अवस्था कठीण, करावे काय?
सोयाबीन,उडीद पिकाला वाचवण्याकरिता फवारणीच्या माध्यमातून खिसा खाली झाला. तरी पिकांच्या अवस्थतेत कोणताही सुधार झाला नाही. त्यातच आता ज्वारीवरही अळीने घाला घातल्याने शेतकऱ्यांची अवस्था मोठी कठीण झाली आहे.सरकारी कर्मचाऱ्यांचे नुकसान झाल्यास सरकारकडून तत्काळ मदत उपलब्ध करुन दिली जाते. मात्र, शेतकऱ्यांचे कितीही नुकसान झाले तरी कुणाला काहीच वाटत नाही. '' पुरुषोत्तममोहोड, शेतकरी, बेलज.

उभ्या आयुष्यात प्रथमच मोठ्या अळींचा प्रकोप
खरीपहंगामातील इतर पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव नेहमीचीच बाब आहे. मात्र, ज्वारीवर इतक्या मोठ्या प्रमाणावर अळ्यांचा प्रकोप उभ्या आयुष्यात प्रथमच पाहत आहे. ज्वारीवर कणसं पडल्यानंतर फवारणी कधी केली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात अळीचा हा प्रकार आश्चर्यजनक आहे.'' सुरेशखडके, शेतकरी, तोडगाव.

केसाळ अळींचा अहवाल पाठवला
^अचलपूरतहसीलअंतर्गत २२०० हेक्टवर ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. यावर मोठ्या प्रमाणात केसाळ अळींचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगांच्या बंदोबस्तासाठी आवश्यक ते उपाय करणे सोयीचे होत नसून, यासंदर्भातील अहवाल वरिष्ठ कार्यालयाला कळवला आहे.'' एस.बी. जाधव, प्रभारी तालुका कृषी अधिकारी .

ज्वारी पिकावर फवारणी करणे अशक्य
कापूस,सोयाबीन, तूर, उडीद आदी पिके फवारणी करून विविध रोगांपासून वाचवता येऊ शकतात. परंतु, ज्वारी पिकावर अळी हा प्रकार पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात दिसत आहे. अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी फवारणी करणे आवश्यक आहे. मात्र, सध्या ज्वारी पिकाच्या उंची दाटी जास्त असल्यामुळे फवारणी करणे अशक्य आहे. त्यामुळे ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. हाती आलेले पीक डोळ्यादेखत फस्त होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
ज्वारीच्या कणसांवर अळ्यांचा मोठा प्रकाेप वाढल्याने पीक धोक्यात आले आहे.
ज्वारीच्या धाड्यांचा भुसाच केला आहे.