आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राला वाचवणारा युवक मात्र बुडाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड - नदीपात्रातबुडत असलेल्या मित्राला वाचवणाऱ्या युवकाचा मात्र बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथे गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता घडली. रुपेश भानुदास गंधबाले (२१,रा. पवनी (स) असे मृतकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रुपेश बुधवारी हा मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथे मित्र सार्थक कुमरे याच्या नातेवाईकाच्या साक्षगंध सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेला होता. या वेळी त्याच्यासोबत सतीश धुर्वे नावाचा मित्रही होता. गुरुवारी तिघेही दुपारी साडे बाराच्या सुमारास माळू नदीवर आंघोळीकरिता गेले. दरम्यान सतीश पाण्यात बुडत असल्याचे रुपेशच्या लक्षात आल्याने तो मित्राला वाचवण्यासाठी गेला. सतीश पाण्याबाहेर आला, परंतु पाणी खोल असल्याने रुपेशला पाण्यातून वर येता आल्याने तो बुडाला. मोर्शी पोलिसांनी शोधकार्यासाठी वापरलेल्या जाळ्यामध्ये रुपेशचा मृतदेह अडकला. मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात बुडालेल्या रुपेशच्या मृत्युमुळे पवनी (स) येथे शोककळा पसरली. रुपेश हा अमरावती येथे एका खासगी कंपनीच्या वाहनावर चालक म्हणून कार्यरत होता. घरच्यांना भेटण्यासाठी तो साेमवारी घरी आल्याची माहिती त्याचे कुटुंबियांनी दिली. मित्राला वाचवण्यासाठी नदीच्या डोहात झेपावलेल्या रुपेशचा करुण अंत झाल्याने समाजमन गहिवरले आहे.