आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस गेले अन् तोतये उभे राहिले, वसुली'चा धंदा सुरू केला होता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- परतवाडा मार्गावरील आसेगावपासून जवळ असलेल्या दर्यापूर फाट्यावर चार तोतयांनी स्वत:ला वाहतूक पोलिस भासवून "वसुली'चा धंदा सुरू केला होता. तोतयांपैकी तिघांना पोलिसांनी मंगळवारी तर पसार असलेला या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला बुधवारी (दि. ९) सकाळी पकडले.
ग्रामीण पोलिस अनेकदा दर्यापूर फाट्यावर "केसेस' करण्यासाठी उभे असतात. त्याचप्रमाणे मंगळवारीसुद्धा ते उभे होते. मात्र, दुपारी वाजता ते जेवणासाठी गेले आणि दुपारी दीड ते दोन वाजतापासून या चार तोतयांनी त्याच ठिकाणावर उभे राहून वसुली सुरू केली होती, अशी माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली. रिंकू मारोती दांडेकर (३० रा. वाकी रायपूर) याला आसेगाव पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.

तत्पूर्वी मंगळवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचेच शासकीय वाहन या तोतयांनी अडवले होते. त्या वेळी पोलिसांनी सूरज बाळू जवंजाळ (२५), संतोष देवराव सरोदे (४६) आणि राहुल रामेश्वर अनासने (२५ तिघेही रा. वाकी रायपूर) या उर्वरितपान.
बातम्या आणखी आहेत...