आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश विसर्जनादरम्यान दगडफेक, 7 जण जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नांदगावपेठयेथे रविवारी गणेश विसर्जनादरम्यान दोन गट क्षुल्लक कारणावरून समोरासमोर आले. दोन्ही गटाने एकमेकांविरुद्ध केलेल्या दगडफेकीमध्ये दोन्ही गटाचे सात जण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करून १५ जणांना अटक केली आहे.

एकाच परिसरात राहणारे काही लोक घरगुती गणपती ट्रॅक्टरमध्ये घेऊन जात होते. याचवेळी त्याच मार्गावर गणपती विसर्जनासाठीच जाणारा एक ट्रॅक्टर उभा होता. आमचा ट्रॅक्टर तर आसेगाव पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करा, अशी मागणी मागे असलेल्या ट्रॅक्टरच्या नागरिकांनी केली. यावरून दोन गटात बाचाबाची झाली. हा वाद झाला त्याच भागात मार्गाच्या कामासाठी दगड गिट्टी होती. दरम्यान दोन्ही गट आक्रमक झाले त्यांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. या दगडफेकीमध्ये दोन्ही गटाचे सात ते आठ जण किरकोळ जखमी झाले आहे.पोलिसांना तातडीने घटनास्थळी पोहोचून वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शांत होत नव्हते. अखेर पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध दंगा इतर कलमान्वये गुन्हे दाखल करून पोलिसांनी १५ जणांना सांयकाळपर्यंत अटक केली होती.

दोन्ही गटांतील १५ जणांना अटक
नांदगावपेठमध्ये रविवारी गणेश विसर्जनादरम्यान दोन गटात वाद झाला. यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये काही व्यक्ती जखमी झाले आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत दोन्ही गटातील १५ जणांना अटक करण्यात आली आहे. सोमनाथ घार्गे, पोलिस उपायुक्त.