आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावली शहीद येथील विद्यार्थ्यांना ई-टॅबचे वितरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या मेळघाटात दुर्गम गावातील विद्यार्थ्यांना ई-टॅबचे वितरण झाल्यानंतर आता अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद येथेही विद्यार्थ्यांना ई-टॅब देण्यात आले आहेत. येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत आठवीतील विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमात ई-टॅब देण्यात आले.

सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत खासदार अडसूळ यांनी यावली शहीद आणि कळमखार ही दोन गावे दत्तक घेतली आहेत. धारणी तालुक्यातील कळमखार या गावात ई-लर्निंग क्लासरूम सोबतच ई-टॅब लायब्ररीसुद्धा सुरू करण्यात आली आहे. यानंतर आता मेळघाटातील प्रत्येक शाळेत व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असा संकल्प खासदार आनंदराव अडसूळ यांनी जाहीर केला आहे. यावली शहीद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता आठव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना मोफत ई-लर्निंग टॅबचे वाटप शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी तहसीलदार सुरेश बगळे, मुख्याध्यापक विनायक मेटे, पं.स. सदस्या ज्योती यावलीकर, नितीन यावलीकर, आस्था संस्थेचे सुनील भालेराव, संसद प्रतिनिधी अविनाश वानखडे, सुनील खराटे, प्रकाश मंजलवार यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावली शहीद येथील विद्यार्थ्यांना खासदार अडसूळ यांनी ई-लर्निंग टॅबचे वाटप केले.
टॅबमध्ये इयत्ता ८, १० चा अभ्यासक्रम : खासदारअडसुळांनी एकऐवजी दोन गावे दत्तक घेऊन नवा आदर्श घालून दिला. खासदार आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री चौधरी बिरेंद्रसिंग यांच्या मुंबई येथील कार्यशाळेत यावली शहीदनंतर मेळघाटातील कळमखार या दुसऱ्या गावाला मान्यता देण्यात आली. आदिवासी भागातील शिक्षणाला प्रथम प्राधान्य द्यावयाचे म्हणून खासदार अडसूळ यांनी सर्वप्रथम कळमखार येथील शाळेत ई-लर्निंग सुरू केले.यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.

शिवसेना प्रमुखांची संकल्पना
विद्यार्थ्यांवरील दप्तराचे ओझे कमी करण्याची संकल्पना शिवसेनेने प्रत्यक्ष अंमलात आणली आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची ही मूळ संकल्पना आहे. या योजनेअंतर्गत आठवीपासून विद्यार्थ्यांना ई-लर्निंग चा लाभ घेता येईल. आनंदराव अडसूळ, खासदार, शिवसेना.