आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eco friendly Ganesh Marathon Compitetion At Sunday

रविवारी इको फ्रेंडली गणेश मॅरेथॉन स्पर्धा, जलप्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती; बाप्पांचेयेत्या काही दिवसांत अगदी वाजत-गाजत अन् थाटात आगमन होणार आहे. मात्र, यंदा नैसर्गिक मातीचे गणपती वापरावे, नैसर्गिक रंगांचा वापर व्हावा, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींची स्थापना करणे टाळावे, पर्यायाने निसर्ग आणि पाणी प्रदूषण टाळावे यासाठी १३ सप्टेंबर रोजी अंबानगरीत इको फ्रेंडली गणेश मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी ७.३० वाजता राजापेठ चौकातून इको फ्रेंडली मॅरेथॉन शर्यतीला सुरुवात होणार आहे. शुभारंभ इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीद्वारे नैसर्गिक स्रोतांच्या रक्षणासाठी ही मॅरेथॉन होणार असून, विदर्भ युथ वेलफेयर सोसायटी शर्यतीचे मुख्य प्रायोजक आहेत. यंदा इको फ्रेंडली गणेश मॅरेथाॅनचे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे अंतर केवळ तीन कि.मी. ठेवण्यात आले आहे. निसर्गाला हानी पोहोचेल अशाप्रकारे गणेशोत्सव साजरा करू नये यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा. तसेच पाणी, डिझेल, पेट्रोल आणि वन्यजीवांचे रक्षण करावे एवढेच नव्हे, तर प्रत्येक मंडळाने वृक्षारोपण कार्यक्रम हाती घ्यावा, असाही संदेश या मॅरेथाॅनद्वारे शहरवासीयांना दिला जाणार आहे. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींमुळे सध्या जलाशये प्रदूषित होत आहेत. श्री गणेशाची मनोभावे पूजा करायची असेल, तर ते नैसर्गिक स्रोतांपासूनच बनलेले असावेत. निर्माल्य हे पाण्यात टाकता ते जमिनीत पुरावे. त्यामुळे जमिनीचा कस वाढेल. प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन शुभारंभ इव्हेन्ट्स आणि विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीने केले आहे.
यासंस्थांचा राहणार सहभाग : इकोफ्रेंडली संदेश देणाऱ्या मॅरेथॉनमध्ये एचव्हीपीएम, िरफाॅर्म्स क्लब, ब्रह्माकुमारीज, मनभरी ग्रुप, बार्बर सलून, जेसीआय अमरावती सिटी, लायन्स रिअल ग्रुप, नॅचरल कन्झर्व्हेशन सोसायटी, वाइल्ड लाइफ एन्हायरमेंटल स्टडी ग्रुप, प्रयास सेवांकुर, शहरातील आखाडे, गणेश मंडळं सहभागी होऊन गणेशोत्सव नैसर्गिकपणे साजरा करण्याचा संदेश देणार आहेत.
तीन किमी अंतरातच होणार शर्यत
महिलापुरुषांसाठी तीन िकमी अंतराची ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्या धावकाला ३००१, दुसऱ्या क्रमांकावरील २००१ आणि तृतीय क्रमांकावरील धावकाला १००१ रु.चा पुरस्कार दिला जाणार आहे. या मॅरेथॉनमध्ये मिशन आॅलिम्पिकही सहभागी होणार आहे. राजापेठ येथून सुरू होणारी ही शर्यत राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक, इर्विन चौक, रेल्वे स्टेशन चौक, राजकमल चौक आणि परत राजापेठ येथे संपणार आहे. नागरिक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही चौकातून शर्यतीत सहभागी होऊ शकतात. मात्र, अॅथलिट्सला राजापेठ चौकातूनच सुरुवात करावी लागेल.
अंबानगरीमध्ये स्पर्धेचे पहिल्यांदाच आयोजन