आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार नगराध्यक्षपदांसाठी मोर्चेबांधणी सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील भातकुली, तिवसा, धारणी नांदगाव खंडेश्वर येथील नगराध्यक्षपदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, सोमवारी (दि. ३०) नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. पहिल्या नगराध्यक्षपदाचा मान आपल्याला मिळावा, यासाठी उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याने अखेर शहराचा प्रथम नागरिक होण्याचा बहुमान कुणाला मिळतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सत्ताप्राप्तीसाठी आवश्यक संख्याबळ मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने नगराध्यक्षपदासाठी २७ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत निवडणूक आहे. तिवसा नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जाती जमातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने दोन महिलांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये प्रभाग तीनमधून विजयी झालेल्या संध्या पखाले प्रभाग आठमधून विजयी झालेल्या रंजना खाकसे या दोन उमेदवारांपैकी एकीच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची, तर दुसरीच्या गळ्यात उपनगराध्यक्षपदाची माळ पडणार आहे. धारणी येथील नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाले असून, निवडून आलेल्या १७ नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादीकडे ८, भाजप ४, काँग्रेस उर्वरित शिवसेनेचे नगरसेवक असून, बहुमतासाठी कुणाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने पेच निर्माण झाला आहे. १७ उमेदवारांमध्ये महिला असून, राष्ट्रवादी भाजपकडे प्रत्येकी ३, काँग्रेसजवळ शिवसेनेजवळ एक महिला सदस्य आहे.
राष्ट्रवादीच्या जमुना चौबे, आशा बी अकबर खान, रजिया बी शरफुद्दीन, काँग्रेसच्या रेखा पटेल रेहाना परवीन सय्यद अशफाक यांचा समावेश आहे.. राकाँने काँग्रेससह भाजप, शिवसेनेची मदत जरी घेतली तरी या पक्षातही महिला असल्याने अडीच-अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद विभागून घेण्याच्या अटीवर संबंधित पक्ष राकाँला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देऊ शकतात. माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम : जिल्हाप्रशासनाने २७ ते ३० नोव्हेंबर असा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. २७ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दोन ते पाच या वेळेत अर्जांची छाननी होऊन पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. २८ नोव्हेंबरला सकाळी ११ ते या वेळात उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. ३० नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्षाची निवड होईल.
सत्तेचा सारीपाट