आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज ग्राहकांना ‘शॉक’, हजार ७९० रुपयांचे आले बिल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पथ्रोट - वीज वितरण कंपनीने ग्राहकांना वीजपुरवठ्यासह अव्वाच्या सव्वा बिल देऊन ‘शॉक’ देणे सुरू केले आहे. कित्येक ग्राहकांचा विजेचा वापर कमी आहे अन् त्यांना बिल मात्र, प्रमाणापेक्षाही अधिक आले अाहे. चार ते पाच आकडी बिलाने ग्राहकांना घाम फोडला असून, वीज वितरण कंपनी ग्राहकांना लुटत असल्याचा आरोप वीज ग्राहकांनी केला आहे.
शहरातील काही वीज ग्राहकांकडे विजेचा मोजकाच वापर होत आहे. परंतु, त्यांना बिल मात्र १३ हजार ४६०, सात हजार, पाच हजार अशा स्वरूपात आल्याने ग्राहकांनी डोक्याला हात लावला आहे. यापैकी बहुतेक ग्राहक हे मजूर आहेत. दोन बल्ब एका टीव्हीव्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणतेही विद्युत उपकरण नाही. वितरण कंपनीने आकारलेल्या बिलामुळे ग्राहकांना शाॅक बसला आहे. श्रीकृष्ण काळे हे भूमिहीन शेतकरी असून, व्यवसायाने स्वयंपाकी आहेत. त्यांना ऑक्टोबर महिन्याचे बिल आले आहे, १३ हजार ४६० रुपये. विजेचा वापर किती, तर दोन बल्ब एक टीव्ही.

याबाबत त्यांनी वीज वितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता, समाधानकारक उत्तर मिळाले नाही. ही अवस्था भिसन नेवारे, शीला धारपवारसह अन्य काही वीज ग्राहकांची आहे. नेवारे यांच्याकडे दोन बल्ब एक टीव्ही असून, त्यांना हजार ७९० रुपये, तर शीला धारपवार यांना केवळ दोन बल्बच्या वापराचे ऑक्टोबर महिन्याचे बिल ११ हजार २०० रुपये आले आहे. यापैकी बहुतेक वीज ग्राहक हे शेतमजुरी करणारे नियमित बिल भरणारे आहेत. नियमित बिल भरूनही ऑक्टोबर महिन्यात आलेल्या बिलाची बिलावरील वापरेल्या विजेच्या युनिटचा आकडा पाहून ग्राहकांना घाम फुटला असून, त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला अाहे.

प्रमाणापेक्षा अधिक येणाऱ्या वीज बिलामुळे त्रस्त झालेले ग्राहक जेव्हा महावितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन तक्रार करतात,तेव्हा उपस्थित अधिकारी बिल आम्ही तयार करीत नाही. त्याचे कंत्राट एका संस्थेला दिल्याचे सांगून मोकळे होत आहेत. वास्तविक पाहता, महावितरण कंपनीने स्वत:च्या सोयीकरिता बिल तयार करून वितरण करणारी यंत्रणा विकसीत केली . मात्र, संबंधित यंत्रणेच्या अनागोंदी कारभाराचा नाहक त्रास्त ग्राहकांनी का म्हणून सहन करायचा,असा प्रश्न ग्राहक उपस्थित करीत आहेत.

आम्ही फक्त बिलाचे टप्पे पाडून देऊ शकतो
^देयक तयार करण्याचे काम हे आमच्याकडे नसून त्याचा कंत्राट पद्धतीने करार एका संस्थेशी करार केला आहे. त्यामुळे आम्हाला युनिटप्रमाणे बिल घ्यावेच लागेल. ग्राहकांच्या सोयीसाठी वीज बिलात त्यांना टप्पे पाडून देऊ शकतो. वीज बिलात काही कमी करता येईल का, याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. एस.एस. इळतापे, कनिष्ठ अभियंता.

ऑक्टोबर महिन्यातील विजेचा वापर बिलाची रक्कम पाहता इतकी मोठी बिलाची रक्कम भरावी कशी, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. बिलामध्ये काही कमी करता येईल काय, म्हणून ग्राहकांनी महावितरणचे कार्यालय गाठले असता, कनिष्ठ अभियंता इळतापे यांनी हे वर्षभराचे बिल असून, संपूर्णच भरावे लागेल, असे सांगत यापूर्वी सरासरी बिल पाठवले. त्यामुळे मागील वर्षभराचे युनिट आणि या महिन्याचे एकत्रित बिल आले असल्याचे सांगितले.

ग्राहकांना पडलाय मोठा प्रश्न
भिसन नेवारेंच्या या झोपडीत दोन बल्क,एक टीव्हीसाठी ५,९७० रुपये बिल आले आहे.
पाेट भरायचे वांदे बिल कसे भरणार?

^मोलमजुरीकरून कसाबसा कुटुंबाचा गाडा पुढे हाकलत आहे. यंदाच्या दुष्काळी नापिकी परिस्थितीमुळे हाताला काम नाही. उदरनिर्वाहाच्या विवंचनेत असतानाच वीज वितरण कंपनीने देयकांच्या माध्यमातून दिलेला झटका खूप मोठा आहे. आता बिल भरायचे कसे हा गहन प्रश्न सतावत आहे. शीलाधारपवार, वीज ग्राहक.

वीज देयकाने दिलाय जबर मानसिक धक्का
^दर महिन्याला येणाऱ्या बिलाच्या तुलनेत या महिन्याचे बिलाची रक्कम खूपच मोठी आहे. नियमित बिल भरूनही या महिन्यात आलेल्या विजेच्या बिलाने विद्युतच्या शॉकपेक्षाही मोठा धक्का दिला आहे. भिसननेवारे, वीज ग्राहक.

खावे काय अन् भरावे काय? हे कळत नाही
^दोनबल्ब एका टीव्हीचा वापर असून आलेल्या बिलाची रक्कम पाहून धक्काच बसला आहे. महिन्याभराच्या तुटपुंज्या मिळकतीत काय खावे बिलाच्या रकमेपाटी काय भरावे, असा प्रश्न आहे. श्रीकृष्णकाळे, वीज ग्राहक.