आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोटांच्या ठशांनीच उघड केली त्याची ‘हातसफाई'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्‍मक फोटो
अमरावती- एकमहिन्यापूर्वी गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तानाजीनगरमध्ये शरदकुमार अकर्ते यांच्या घरात घडलेल्या चोरीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, याप्रकरणी अकोल्याच्या एका घरफोड्याला ताब्यात घेतले आहे. घरफोडीच्या वेळी तो नालीत पडल्यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली होती.
यावेळी पोलिसांनी पकडल्यानंतरही तो घरफोडीची कबुली देत नव्हता. अखेर पोलिसांनी घरफोडी केलेल्या घटनास्थळावरील फिंगरप्रिंट त्याचे फिंगरप्रिंट जुळवून पाहिले असता ते तंतोतंत जुळले. त्यानंतर घरफोड्यानेही गुन्ह्याची कबुली दिली. ज्या हाताच्या बोटांद्वारे तो हातसफाई करून चोरी करीत होता, त्याच बोटांच्या ठशाने त्याची हातसफाई उघड केली आहे. शेख इक्बाल अहमद शेख (३५ रा. रामदासपेठ, अकोला) असे त्या घरफोड्याचे नाव आहे.
गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पॅराडाइज काॅलनी आजूबाजूच्या परिसरात पाच ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली शेख इक्बालने गाडगेनगर पोलिसांना दिली आहे. तसेच त्याने घरफोडीच्या वेळी चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची माहिती घेऊन पोलिसांनी ते जप्त केले आहे. अकोला येथील एका सुवर्ण व्यावसायिकाकडे चोरीचे दागिने विकल्याची माहिती त्याने दिल्यामुळे पोलिसांनी अकोला गाठून त्या सुवर्ण व्यावसायिकाला ताब्यात घेतले. मात्र, सुवर्ण व्यावसायिक सुरुवातीला मान्य करीत नव्हता.