आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जाला कंटाळून दर्यापूरच्या शेतकऱ्याने घेतले जिवंत जाळून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सततची नापिकी, यंदाही तीच परिस्थिती कायम होती. त्यामुळे अपेक्षित पीक झाले नाही. यामुळे डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर कमी होण्याऐवजी वाढतच आहे. बँकेचे कर्ज कायमच आहे. त्यामुळे ओळखीतून मिळेल त्या व्यक्तींकडून कर्ज घेतले, तेसुद्धा कायमच आहे. अशाच विवंचनेत असलेल्या लाखनवाडी येथील एका ४० वर्षीय शेतकऱ्याने बुधवारी (दि. २७) राहत्या घरातच जिवंत जाळून घेतले. यामध्ये शेतकरी गंभीररीत्या भाजला असून, त्याच्यावर इर्विन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रामेश्वर रमेशराव जंवजाळ (४०, रा. लाखनवाडी, ता. दर्यापूर), असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. रामेश्वर जवंजाळ यांच्याकडे लाखनवाडी शिवारात दोन एकर शेत आहे. या वर्षी त्यांनी शेतात सोयाबीन तूर पेरली होती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतातून उत्पादन झाले नाही. यातही जवंजाळ यांनी दोन ते तीन वर्षांपूर्वी एका बँकेकडून ५० हजार रुपये कर्ज घेतले होते. अपेक्षित उत्पादन झाल्यामुळे जवंजाळ यांनी बँकेचे कर्ज फेडता आले नाही, यातही दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे नापिकीचे चक्र सुरूचहोते. त्यामुळे जवंजाळ यांनी गावात किंवा अन्य ओळखीच्या व्यक्तीकडून उधारीवर रक्कम घेतली. कर्जाची रक्कम वाढतच होती. अशात कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि कर्जाची परतफेड कशी करणार, याच विंवचनेत ते होते. दरम्यान, बुधवारी दुपारी त्यांची पत्नी शेतात गेली होती. या वेळी वर्षांची मुलगी श्रावणी शाळेत, तर वर्षांचा मुलगा सोहम बाहेर गेला होता. रामेश्वर यांनी घरात कोणी नसल्याचे पाहून अंगावर रॉकेल घेऊन जाळून घेतले. यामध्ये जवंजाळ यांचे घरसुद्धा जळाले आहे. घरातून आगीचे लोळ बाहेर येत असल्याचे दिसताच गावकऱ्यांनी धाव घेऊन रामेश्वर यांना विझवले तातडीने उपचारासाठी इर्विन रुग्णालयात आणले. या वेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता ते ९६ टक्के जळाल्याचे सांगितले. त्यांच्यावर इर्विन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे तातडीने इर्विनमध्ये दाखल झाले होते.
संबंधित डॉक्टरच्या वैद्यकीय चाचणीची मागणी
^आम्हाला माहिती मिळताच आम्ही तातडीने इर्विन रुग्णालयात दाखल झालो. त्या वेळी अपघात कक्षात असलेल्या डॉक्टरला या शेतकऱ्यासंदर्भात माहिती विचारली असता, त्यांना काहीही माहिती नव्हती. तसेच त्या डॉक्टरांनी मद्यप्राशन केले होते. या प्रकाराची माहिती आम्ही तातडीने इर्विनच्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. त्या डॉक्टरची वैद्यकीय चाचणी करण्याची मागणी केली आहे, अशा पद्धतीने काम झाल्यास रुग्णांवर कसे उपचार होतील, असा प्रश्न निर्माण होतो. - प्रा. श्रीकांत देशपांडे, आमदार.