आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळीने दिला रोजगार, बसल्या जागेवर मजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा - मेळघाटातील आदिवासी शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळू लागला आहे. चिखलदऱ्यात अलीकडेच स्ट्रॉबेरी उत्पादनाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता काटकुंभ येथील प्रयाेगशील शेतकरी गणेश राठोड यांनी मागील अनेक वर्षांपासून डोंगराळ भागात पांढऱ्या मुसळीची शेती करत आहेत. या मुसळीच्या शेतातून शेकडो आदिवासी महिला पुरुषांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून, रोजगाराच्या शोधार्थ भटकंती करणारे आदिवासी मजूर आत्मनिर्भर होताना दिसत आहेत. राेजगार निर्मितीसाठी पांढरी मुसळीची लागवड लाभदायक ठरत आहे.
आरोग्यासाठी शक्तिवर्धक आयुर्वेदातील म्हत्त्वपूर्ण वनऔषधी म्हणून मुसळीचा उल्लेख होताे. मेळघाटात जंगली मुसळीचे उत्पादन कमी असले तरी गणेश राठोड यांच्या शेतात मात्र दरवर्षी मोठ्या प्रमाणात मुसळीचे उत्पादन घेतल्या जाते. मेळघाटातील पांढऱ्या मुसळीला विदेशी बाजारपेठत चांगली मागणी आहे. काटकंुभ परिसरातील ते १० शेतकऱ्यांनी १५ हेक्टरमध्ये पांढऱ्या मुसळीची लागवड केली आहे. राठोड यांनी १५ एकर शेतात मुसळी लावली असून एकरी अडीच लाख रुपये खर्च वजा जाता त्यांना एक लाख रुपयांचे उत्पादन होते. या मुसळीला विदेशी बाजारपेठेतही विशेष मागणी आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैद्राबाद येथे ही मुसळी विक्रीकरिता पाठवली जाते. मुसळीच्या शेतीतून २०० शेतकऱ्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. काही आदिवासी शेतकरी आंतरपीक म्हणूनही मुसळीची लागवड करीत आहेत.

^मुसळी साफकरण्याकरिता मजुरांची आवश्यकता असते . माझे ५० वर्षांचे वय झाल्याने कठीण काम होत नाही. बसल्या जागेवर या माध्यमातून मजुरी उपलब्ध होत अाहे.ही समाधानाची बाब आहे. लीला बचले, महिलामजूर, डोमा.

बेरोजगारांना राेजगार दिल्याचे मनस्वी समाधान
^गेल्या अनेक वर्षांपासून टप्प्याटप्याने पांढऱ्या मुसळी पिकाचे क्षेत्र वाढवले अाहे. ही शेती करण्यासाठी विविध स्तरावरून माहिती घेत आहे. ही शेती कष्टाची असली तरी हमखास उत्पादन देणारी आहे. या शेतीतून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळ रोजगारासाठी गावोगाव भटकंती करणाऱ्यांच्या मजुरांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटते. गणेश राठोड, शेतकरी,काटकुंभ.

१५० ते २०० मजुरांना गावामध्येच राेजगार
काटकुंभ येथे मुसळीचे पीक घेतल्या जात असून रोजगारासाठी मेळघाट सोडणाऱ्या आदिवासी बांधवांना यामुळे गावातच रोजगार मिळत आहे. १५० ते २०० मजूर मुसळी तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत

औषधी,शक्तिवर्धक बलवर्धक गुणधर्म
मेळघाटात होणाऱ्या पांढऱ्या मुसळीचे शास्त्रीय नाव क्लोरोफायटम बोरिव्हीलियनम असे असून यामध्ये अौषधी शक्तिवर्धक गुणधर्म आढळतात. विविध आजारांवर गुणकारी असणारी पांढरी मुसळी मेळघाटातील रोजगारासाठी विशेष लाभदायी ठरत आहे.

बातम्या आणखी आहेत...