आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरभराही देणार दगा...अल्प पावसामुळे जमिनीत ओलावा कमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अल्प पावसामुळे जमिनीत कमी असणारा ओलावा, समाधानकारक नसणाऱ्या थंडीमुळे जिल्ह्यातील हरभऱ्याच्या पिकाला या वर्षीही फटका बसणार असण्याचा अंदाज तज्ज्ञ शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, याचा सर्वाधिक फटका कोरडवाहू पट्ट्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे.
जिल्ह्यात खरिपात शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. सोयाबीनने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कापसाला अद्यापही समाधानकारक भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा हरभऱ्याच्या पिकावर टिकून होत्या. परंतु, झालेला अल्प पाऊस थंडीचा अभाव यामुळे हरभऱ्याला या वर्षीही जबर फटका बसण्याचा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात भातकुली, दर्यापूर, अमरावती, नांदगावपेठ, अंजनगाव सुर्जी या तालुक्यात हरभरा रब्बीचे प्रमुख पीक आहे.
सप्टेंबरपर्यंत समाधानकारक पाऊस झाल्यास खारपाणपट्ट्यात हरभऱ्याचे पीक समाधानकारक येते. परंतु, या वर्षी समाधानकारक पाऊसच झाल्यामुळे जमिनीत समाधानकारक ओलावा नाही. काही शेतकऱ्यांनी आॅक्टोबरच्या शेवटी हरभऱ्याची पेरणी केली. परंतु, वातावरणातील तापमानामुळे या हरभऱ्याचीही वाढ समाधानकारक होऊ शकली नाही. मागील वर्षीही कोरडवाहू पट्ट्यात हरभऱ्याला जबर फटका बसला होता. खारपाणपट्ट्यातील हरभऱ्याची चव वेगळी असल्याने त्याला मोठी मागणी असते.

एकरी दोन ते पाच क्विंटल उत्पादनामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले होते. पावसाअभावी बऱ्याच शेतकऱ्यांची जमीनही प्रथमच रब्बी हंगामात पडीक पडली होती. परंतु, या वर्षी मागील वर्षीच्या अनुभवाने बऱ्याच शेतकऱ्यांनी थंडी पडण्यापूर्वी लवकर पेरणी केली. त्यातच ढगाळ वातावरणामुळे त्यावर अळ्या रोगाचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकरी हवालदिल झाल आहेत. खरिपापाठोपाठ आता रब्बीतील नगदी पीक असलेल्या हरभऱ्यावर अळ्यांनी आक्रमण केल्याने शेतकऱ्यांच्या उरल्या,सुरल्या आशा मातीत िमसळल्याची चिन्ह िदसत आहेत.

पावसाची नितांत गरज
^उशिरा झालेल्या पेरण्यांना पावसाअभावी फटका बसून उत्पादन घटण्याची शक्यता आहे. सध्या वाढ समाधानकारक असली तरी पावसाची आवश्यकता आहे. तालुक्यात मर रोगाचे प्रमाणही कमी आहे. विनोद लंगोटे, तालुका कृषी अधिकारी,

अळ्यांचा प्रादुर्भाव
^हरभऱ्याचे पीक सध्या बोटभर असून, त्यावर अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. नियंत्रणासाठी फवारणी सुरू आहे, परंतु थंडी पडल्यास एकरी पाच क्विंटल हरभरा होणेही कठीण दिसते. संजय घाटे, सासन, ता. दर्यापूर

आता शाश्वती नाही
^मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी हरभऱ्याच्या पेरण्या झाल्या. परंतु, जमिनीत ओलावा थंडी नसल्यामुळे हरभऱ्याचे पीक समाधानकारक होईल याची शाश्वती राहिली नाही.शेतकऱ्यांची व्यथा कोण जाणणार ? अरुणगावंडे, उमरी बाजार, ता. दर्यापूर

फवारणीचा खर्च वाढला, शेतकरी िचंतेत
तूरहरभऱ्यावर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच सोयाबीन, मूग, उडदाचेही पीक समाधानकारक झाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. रब्बी हंगाम उभा करण्याची स्थिती नसतानाही शेतकऱ्यांनी कशीबशी हरभऱ्याची पेरणी आटोपली आहे. दरम्यान, पैशाअभावी कृषी केंद्र चालकांची थकित देणी थकल्यामुळे उधारीही बंद झाली आहे. अशातच फवारणीचा खर्च वाढल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.