आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ: जन्मदात्या पित्यानेच बालकाच्या पोटात कैची खुपसून केला निर्घृण खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वणी- झरी तालुक्यातील भेंडाला या गावी एका मनोरुग्ण व्यक्तीने स्वत:च्याच सहा महिन्याच्या मुलाच्या पोटात कैची खुपसून निर्घृण खून केला. ही घटना मंगळवारी सकाळी वाजता दरम्यान घडली. मुकुटबन पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपी वडील संतोष धांडे यास अटक केली. अंश संतोष धांडे, असे मृतकाचे नाव आहे. 

भेंडाला येथील मनोरुग्ण संतोष धांडे हा सहा महिन्याचा मुलगा अंशसोबत घरातील घाटीवर मंगळवारी सकाळी खेळत होता. दरम्यान, त्याने घरात जाऊन कैची आणून अंशच्या पोटात घुसवली. यात अंशचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच घरातील सदस्यांनी मनोरुग्ण संतोषला पकडले. दरम्यान, मृतकाच्या भावाने मुकुटबन पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून संतोष धांडेला ताब्यात घेतले. त्यानंतर अंशचा मृतदेह पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. 
बातम्या आणखी आहेत...