आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या शोधासाठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पाच महिन्यांपूर्वी शहरातील दस्तूरनगर भागात एक व्यक्ती भुकेमुळे व्याकुळ अवस्थेत पडून होता. त्यावेळी गस्तीवर असलेल्या पीएसआय भगवान कोळी यांनी माणुसकीचा परिचय देत त्या व्यक्तीला पाणी पाजले त्यांच्या भोजनाची व्यवस्था करून दिली. कोळी त्या व्यक्तीला पाणी पाजत असतानाचे एक छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले ते थेट बिहारपर्यंत पोहचले. त्यामुळेच सोमवारी (दि. २८) बिहार राज्यात राहणारा एक युवक शहरात आला. या छायाचित्रामध्ये असलेली व्यक्ती वडील असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे पोलिस तो युवक त्या व्यक्तीचा शहरात शोध घेत आहे.

बिहारमधील मजीपुरा जिल्ह्यातील गमारिया येथे राहणारा सुशीलकुमार मोहता हा युवक त्याच्या वडीलांच्या शोधात सोमवारी दुपारी शहरातील राजापेठ ठाण्यात पोहचला होता. सुशीलकुमारसोबत त्याचा संतोषकुमार हा नातेवाईकसुध्दा आलेला आहे. या दोन्ही युवकांनी राजापेठ ठाण्यात एपीआय रवि राठोड यांची भेट घेवून संबधित विषय सांगितला. त्यावेळी त्या युवकांना सहकार्य करून फ्रेजरपुरा पोलिसात पाठवले. त्या युवकांनी फ्रेजरपुरा ठाण्यात जाऊन पीएसआय भगवान कोळी यांची भेट घेतली. मे महीन्याच्या पहील्या आठवड्यात एक दिवस दुपारच्या वेळी उपनिरीक्षक कोळी आपल्या पथकासह गस्तीवर गेले होते. त्यावेळी दस्तूरनगर भागात त्यांना एक व्यक्ती व्याकुळस्थितीत उन्हात पडून असल्याचे दिसले होते. त्यावेळी कोळी यांनी त्या व्यक्तीला सावलीत आणले, त्याला पाणी पाजले, भोजनाची व्यवस्था करून दिली. दरम्यान याचवेळी उपनिरीक्षक कोळी त्या व्यक्तीचे छायाचित्र काढून ते सोशल मिडीयावर अपलोड केले. मागील पाच महीन्यात ते छायाचित्र संपुर्ण देशातच व्हायरल झाल्याचे बिहारमधून आलेल्या युवकांवरून लक्षात येते.
बिहारवरून आलेल्या या युवकांकडे तेच छायाचित्र आहे. त्यामुळे पोलिस ते युवक या व्यक्तीचा शहरात शोध घेत होते. हे माझे वडील असून त्यांचे नाव जय नारायण असल्याचे सुशीलकुमार याने पोलिसांना सांगितले आहे. असे असले तरी काही दिवसांपुर्वी अलाहाबाद, रायगड, मुंबई येथूनही काही व्यक्ती आले होते. ते सुध्दा हेच छायाचित्र घेवून पोलिसांकडे आले होते. छायाचित्रातील व्यक्ती आमचे नातेवाईक असल्याचे त्यांचेही म्हणने होते. त्यामुळे त्या व्यक्तीचे नातेवाईक नेमके कोण? हा प्रश्न आता पेालिसांपुढे उपस्थित झाला आहे. मात्र पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे