आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच सख्ख्या भावांसह सहा दरोडेखोरांना केले गजाआड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- परतवाडा शहरातील एका घरात दरोडा टाकून पावणे चार लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या त्याच दिवशी इतर दोन गुन्हे करणाऱ्या दरोडेखोरांची निम्मी टोळी पकडण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला अखेर यश आले आहे. पोलिसांनी सहा दरोडेखोरांना बुलडाणा जिल्ह्यातील लोणी लव्हाळा या गावातून मंगळवारी (दि. १७) पहाटे अटक केली असून, सहा जणांच्या या टोळीत पाच सख्खा भावांचा समावेश आहे. याच प्रकरणातील अाणखी पाच -जण फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहे.
दहीमन बालाजी भोसले (३०), राजेेंद्र बालाजी भोसले (२८), चुब्बा बालाजी भोसले (२३), कफूर बालाजी भोसले (२५), सखाराम बालाजी भोसले (१९, सर्व रा. लोणी लव्हाळा ता. मेहकर जि. बुलडाणा) आणि मंजा संतोष पवार (१९ रा. भानखेड, चिखली) असे पोलिसांनी अटक केलेल्या दरोडेखारांची नावे आहेत. या व्यतिरीक्त अजून पाच जणांचा दरोड्यामध्ये सहभाग असल्याचा पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. सोमवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या एपीआय नीलेश सुरडकर एपीआय नागेश चतरकर यांच्या दोन पथकांनी बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश करून रात्रभर ऑपरेशन राबवून ही कामगिरी केली आहे.
परतवाड्यातील संजय अतकरे यांच्या घरी नोव्हेंबरच्या मध्यरात्री अकरा दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. त्यावेळी दरोडेखोरांनी लाख ९५ हजारांची रोख लाख ७७ हजारांचे दागिने असा एकूण लाख ७२ हजारांचा ऐवज लंपास केला होता. तसेच परतवाड्यालगतच्या गौरखेडा शिवारात एका शेतातील रखवालदराला मारहाण करून त्याच्याकडील दहा हजार रुपये मोबाईल हिसकावून नेला होता.तसेच दरोडा टाकून परत जातेवेळी परवाड्यातूनच दोन दुचाकीसुद्धा चोरल्या होत्या. उर्वरितपान.
दरोड्याने केली दिवाळी साजरी : दरोड्यामध्येलुटलेला एेवज अकरा जणांनी वाटून घेतला. त्यानंतर दोन दिवसांनीच दिवाळी असल्यामुळे यासर्वांनी याच पैश्यातून दिवाळीसाठी नवीन कपडे, बुट अन्य साहित्य खरेदी केले. पोलिसांनी त्यांना अटक करून आणले त्यावेळी काही दरोडेखोरांच्या अंगात नवीन कपडे बुट दिसत होते. या रकमेतूनच दिवाळी साजरी केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

भोसले आणि पवार यांचीच ‘गँग'
सहादरोडेखोरांपैकी पाच जण सख्खे भाऊ असून ते भोसले आहेत. तर उर्वरीत पाच जणांमध्ये चार पवार त्याचे नातेवाईक आहेत. यापुर्वीसुद्धा त्यांनी काही गुन्हे केले का? याबाबत पोलिस माहिती घेत आहे. यामध्ये पोलिसांनी अटक केलेला मंजा हा पवार तर चुब्बा हा भोसले गँगचा प्रमुख असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांविरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरोडा टाकतेवेळी त्यांनी अतकरे यांच्या घरातून रोख सोन्याचे दागिने लंपास केले. हा ऐवज जवळ घेण्यावरून पवार भोसले यांच्यात त्या घरातच वाद झाला होता.

दोन दुचाकीवरून नऊ जणांचा प्रवास
दरोडाटाकून हे ११ जण अतकरे यांच्या घरातून मध्यरात्री १.३० वाजता बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी दोन दुचाकी चोरून मांजरी गावापर्यंत प्रवास केला. त्या ठिकाणी चोरीच्या दुचाकी टाकून त्यांनी अकोट, शेगाव मार्गे बुलडाणा गाठून गावात पोहचले. त्यांनी दरोड्यासाठी स्वत:चे वाहन वापरले नव्हते. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांना तपासाची दिशा मिळण्यास अडचण आली.
या प्रकरणातील अाणखी पाच जण फरार असून, ग्रामीण गुन्हे शोखेचे पोलिस पथक त्यांचा शोध घेत आहे.
शोध
सहा दरोडेखोरांना बुलडाणा जिल्ह्यातील लोणी लव्हाळा या गावातून मंगळवारी अटक केली
अटक
परतवाड्यातील संजय अतकरे यांच्या घरी नोव्हेंबरच्या मध्यरात्री अकरा दरोडेखोरांनी टाकला होता दरोडा.
दरोडा
अटक केलेल्या दरोडेखोरांसोबत ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी कर्मचारी.