आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुल्या उड्डाणपुलावरच ग्रामस्थांचे झाले एकमत, ग्रामपंचायतीत ठराव पारित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा; मागीलदोन वर्षांपासून रखडलेल्या मोझरी येेथील उड्डाणपुलाच्या कामाला श्री गुरुदेव सेवा मंडळाने विरोध दर्शवल्यानंतर आता मोझरी ग्रामपंचायतीने विशेष सभा आयोजित करून खुला उड्डाणपूलच व्हावा, असा ठराव पारित केला आहे. त्यामुळे या उड्डाणपूल निर्माण कार्यातील अडचणी वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पाच बोगदे असणाऱ्या ८५० मीटरचा उड्डाणपूल होणार असल्याचा निर्णय होताच त्याला विरोध सुरू झाला. गुरुदेव सेवा मंडळाने याबाबत विरोधी भूमिका घेतली. गुरुदेवनगर ग्रामपंचायतीने खुला उड्डाणपूल व्हावा अशी मागणी केली, तर मोझरी येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत खुलाच उड्डाणपूल व्हावा, असा ठराव ग्रामस्थांकडून पारित करण्यात आला आहे. मोझरी येथे झालेल्या ग्रामसभेत सरपंच विद्या बोडखे यांच्या उपस्थितीत खुला उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या वेळी गावातील अनेक नागरिकांनी रखडलेल्या गुरुकुंजातील महामार्गाविषयी मत व्यक्त केले. ग्रामसभेत मत व्यक्त करताना ग्रामस्थांनी गुरुदेव सेवा मंडळाचा चांगलाच समाचार घेतला. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेत ग्रामसभेला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. ग्रामसभेच्या निर्णयामध्ये खुला उड्डाणपूल झाल्यास आंदोलन करण्याचा ठराव घेण्यात आला.

शासनाचाही निषेध
तिवसायेथे उड्डाणपुलाच्या मुद्द्याबाबत झालेल्या बैठकीत मोझरी ग्रामपंचायतीला साधी विचारणाही झाल्यामुळे ग्रामसभेमध्ये नागरिकांनी शासनाचा निषेध केला.

सदस्यच गैरहजर
विशेष ग्रामसभेला ग्रामस्थ थंडीची पर्वा करता गावाच्या विकासासाठी उपस्थित होते. मात्र, त्याच वेळी बोटावर मोजण्याइतकेच सदस्य सभेला उपस्थित होते. बाकीचे गैरहजर असल्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...