आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्न औषधी प्रशासनाचे शहरात १२५ ठिकाणी छापे ,७६ जणांविरुद्ध केली कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्यात तीन वर्षांपूर्वी गुटखा पानमसाला विक्रीवर कायद्याने बंदी असली तरी शहरात गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, पान मसाल्याची सर्रास विक्री सुरू आहे. या अवैध विक्रीला पायबंद घालून विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी मंगळवारी (दि. ४) अन्न औषधी प्रशासनाने शहरात ‘जम्बो ऑपरेशन' राबवले. नागपूर, औरंगाबादसह अमरावती विभागातील तब्बल दीडशे अधिकारी कर्मचाऱ्यांनी ३० शिकाऊ डॉक्टर पोलिसांच्या मदतीने शहरात १२५ ठिकाणी धाडी टाकल्या. या वेळी ७६ जणांविरुद्ध कारवाई करून ८६ हजारांचा गुटखा अन्य तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले.

‘तंबाखूमुक्त समाजासाठी अभियाना'च्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी १२ वाजतापासून शहरातील विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. या मोहिमेत नागपूर, औरंगाबाद विभागाचे कर्मचारी अधिकारी सहभागी झाले होते. तसेच शहरातील दंत महाविद्यालयाचे ३० शिकाऊ डॉक्टर सहा वरिष्ठ डॉक्टर तसेच पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना सोबत प्रत्येकी पाच जणांची चमू तयार करण्यात आली होती. या चमूमध्ये एक अन्न सुरक्षा अधिकारी, औषधी निरीक्षक, शिकाऊ डॉक्टर, पोलिस यांचा समावेश होता. जिल्हाधिकारी यांच्याकडून वाहनांची मदत घेण्यात आली. कारवाई करताना तंबाखूचे दुष्परिणाम काय आहे, तसेच त्यामुळे होणारी हानी ही माहिती देण्यासाठी डॉक्टरांनाही सोबत घेण्यात आले होते,अशी माहिती अन्न औषधी विभागाचे सहायक आयुक्त चंद्रकांत साळुंके यांनी दिली. पत्रकार परिषदेला नागपूरचे सहायक आयुक्त शिवाजी देसाई तसेच दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राम ठोंबरे उपस्थित होते.