आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन विभाग राबवणार स्वच्छता अभियान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- पंतप्रधानांच्यासंकल्पनेतून महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ऑक्टोबर २०१४ पासून देशभरात स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. आता वन विभागही राज्यभरात या अभियानात सहभागी होत असून, क्षेत्रीयस्तरावर प्रत्येक कार्यालयात आठवड्यातून किमान तास श्रमदानातून स्वच्छता करण्यात येणार आहे.

अभियानात वन विभागांतर्गत सर्व कार्यालये, कार्यालयांचा परिसर, शासकीय निवासस्थाने, विश्रामगृहे, मोकळ्या जागा स्वच्छ करणे, जेणेकरून कामाच्या ठिकाणी परिसरात स्वच्छता राहिल्यास सौंदर्य विकासात भर पडेल काम करण्यास उत्साहवर्धक वातावरणाची निर्मिती होईल. त्यातून कार्यक्षमता वाढून कर्मचारी, अधिकारी मनुष्यबळाची उत्पादकता वाढेल, असे सुचवले आहे. तसेच कार्यालये विश्रामगृह या ठिकाणी स्वच्छतागृहे नेहमी सुस्थितीत स्वच्छ ठेवण्यात येतील. पाण्याची टाकी, वीज आदींची पाहणी करण्यात येईल. तसेच ज्या ठिकाणी स्त्रियांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी त्यावर भर देण्यात येईल. तसेच शासकीय निवासस्थानांमध्ये प्रत्येक सदनिका बंगलाधारकांनी त्यांच्या घरामध्ये निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे ओला सुका असे स्वतंत्र विभाजन करून घ्यावे. याप्रकारे मोहीम आहे.

ऐच्छिक श्रमदानाद्वारे स्वच्छता मोहीम
अभियानातअधिकारी-कर्मचारी यांना वर्षातून किमान १०० तास, आठवड्यातून तास कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त ऐच्छिक श्रमदानाद्वारे स्वच्छता मोहीम राबवायची आहे. दर शुक्रवारी सायंकाळी मोहीम राबवावी. श्रमदानापूर्वीचे छायाचित्र नंतरचे छायाचित्र काढून घ्यावेत. फोटो प्रसिद्धीसह कार्यालयास सादर करावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

परिसर पूर्णत: स्वच्छ ठेवावा
मोकळ्याजागेत पडलेले स्क्रॅप मटेरिअल, इलेक्ट्रॉनिक्स कचरा, प्लास्टिक बोर्ड, फ्लेक्सची योग्य विल्हेवाट लावावी. ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असून, कार्यालय परिसरात त्यावर पूर्णत: बंदी घालावी. निसर्ग वन पर्यटन केंद्रात शुद्ध पाणी कायमस्वरूपी स्वच्छतागृहाची उपलब्धता असावी. तसेच असा परिसर पूर्णत: स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.