आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"एफआयआर'ची कॉपी व्हॉट्सअॅपवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पोलिस ठाण्यात गेल्यानंतर त्वरित तक्रारीचे निराकरण होण्यापेक्षा साधी एफआयआरची प्रत मिळवण्यासाठीच तक्रारदाराला मनस्ताप सहन करावा लागत होता. हा मनस्ताप टळावा म्हणून तक्रारदाराला व्हॉट्सअॅपवर एफआयआरची प्रत देण्याचे आदेश पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी नुकतेच दिले आहेत. याच बाबींचे अनुकरण करून अमरावतीचे पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनीही आयुक्तालयातील सर्व ठाणेदारांना व्हॉट्सअॅपवर एफआयआरची प्रत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पोलिस ठाण्यात जाऊन एफआयआरची प्रत मिळवण्यासाठी होणारी तक्रारदाराची हेळसांड यामुळे थांबणार आहे.तक्रारदाराला शक्यतो लगेचच 'एफआयआर'ची हार्ड कॉपी देण्यात यावी. ते शक्य नसल्यास 'एफआयआर'चा फोटो काढून तो शक्य तितक्या लवकर 'व्हॉट्सअॅप'वर पाठवावा, असेही आयुक्तांनी सांगितले आहे. पोलिस खाते डिजिटलाइज्ड करण्यावर नव्या पोलिस महासंचालकांचा भर आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना झाला पाहिजे, या भावनेतून 'एफआयआर'ची प्रत आता 'व्हॉट्सअॅप'वर पाठवावी, असे आदेश संपूर्ण राज्यभरातील पोलिसांना देण्यात आले आहेत. गुन्हा दाखल केल्यानंतर तक्रारदाराला 'एफआयआर'ची कॉपी देणे पोलिसांना बंधनकारक अाहे. मात्र, अनेकदा काही ना काही कारणाने तक्रारदाराला कॉपी देताना टाळाटाळ होते, असे राज्यभरातील चित्र असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळेच 'एफआयआर'ची कॉपी तक्रारदाराला वेळेत देण्यासाठी 'व्हॉट्सअॅप'ची मदत घेण्यास पोलिस महासंचालकांनी सांगितले आहे.

आयुक्तांनी आदेश दिल्यामुळे पोलिसांना एफआयआरची कॉपी वेळेतच द्यावी लागणार आहे. तक्रारदाराकडे स्मार्ट फोन असल्यास ही कॉपी मागणार आहे.

तक्रारकर्त्यांना सुलभ
^तक्रारदाराला वेळेत एफआयआरची कॉपी मिळणे आवश्यक आहे. एफआयआरची झेरॉक्स कॉपी देण्यात आली तर उत्तमच आहे. मात्र, परिस्थितीनुसार ती वेळेत देण्यासाठी व्हॉट्सअॅपचाही वापर करता येणार आहे. पोलिस महासंचालकांच्या आदेशामुळे आम्ही आयुक्तालयातील सर्व ठाण्यांना एफआयआरची कॉपी व्हाॅट्सअॅपवर देण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. राजकुमारव्हटकर, पोलिस आयुक्त, अमरावती.