आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाट सफारीला आजपासून सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चिखलदरा नगर परिषद आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने चिखलदरा येथे भेट देणा-या पर्यटकांकरिता पावसाळ्यात जागतिक व्याघ्र दिन २९ जुलैपासून पावसाळ्यातील मेळघाट सफारी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्प, गुगामल वन्यजीव विभागाचे उप वन संरक्षक रवींद्र वानखडे यांनी दिली.
मेळघाट सफारी चिखलदरा नगर परिषद येथून २० आसनांच्या मिनी बसने सुरुवात होईल. सकाळचा मार्ग चिखलदरा ते सेमाडोह, कोलकास, सेमाडोह व परत चिखलदरा या मार्गाने निसर्गरम्य स्थळ दर्शनाचे अंदाजे १५० कि.मी. भ्रमंती सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. यासाठी प्रति व्यक्ती ३०० रुपये शुल्क आकारण्यात येईल. तसेच संध्याकाळचा मार्ग चिखलदरा, वैराट, परत चिखलदरा अंदाजे ३० कि.मी. वेळ संध्याकाळी ४ ते ६.३० पर्यंत भ्रमंती होईल. यासाठी प्रती व्यक्ति १०० रुपये शुल्क आकारण्यात येईल.
चिखलदरा व मेळघाटात येणा-या व मुक्कामी राहणा-या निसर्गप्रेमींनी या सफारीचा निश्चितपणे लाभ घ्यावा, असे आवाहन उप वन संरक्षक रवींद्र वानखडे यांनी केले आहे.

मार्गदर्शकांची सोबत
>मेळघाटच्या निसर्गरम्य भौगोलिक क्षेत्रात पावसाळ्यात भ्रमंती करताना प्रशिक्षित निसर्ग मार्गदर्शक सोबत असणार आहे. विविध वनस्पती, पक्षी, कीटक व नैसर्गिक प्रक्रियांबाबतची माहिती निसर्ग मार्गदर्शक पुरवतील.
>सफारी शुल्कामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेश शुल्क व मार्गदर्शक शुल्क समाविष्ट आहे.
>सफारीकरिता बुकिंग चिखलदरा नगर परिषद व वन परिक्षेत्र अधिकारी चिखलदरा यांच्या कार्यालयात सकाळी ८ ते सायं. ५ वाजेपर्यंत संपर्क.