आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पांच्या दर्शनाकरिता भाविकांची अलोट गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दहा दिवस मनोभावे बाप्पांची पूजा-अर्चना करून जड अंत:करणाने भाविकांना बाप्पाला रविवारी निरोप द्यावा लागणार आहे. गणेशाची स्थापना होऊन दिवस कसे आनंदात गेले हे कळलेदेखील नाही. बघता बघता रविवार, २७ सप्टेंबर रोजी बाप्पांचे विसर्जन होणार आहे. भाविकांची इच्छा नसतानाही त्यांना गणरायाला निरोप द्यावा लागणार आहे. पुढच्या वर्षी पुन्हा बाप्पाने लवकर येण्यासाठी शहरातून जल्लोषात श्रींचा विसर्जन मिरवणूक सोहळा रंगणार आहे. यासाठी मंडळांनी जंगी तयारी केली असून ढोल पथक, दिंडी, असा दिमाखदार सोहळा रविवारी शहरातील नागरिकांना बघायला मिळणार आहे.
दरम्यान, शहरातील बहुतांश मंडळांतील बाप्पांचे विसर्जन रविवार, २७ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे, तर काही मोजके मंडळांचे देखावे तेथील बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना आणखी वेळ मिळणार आहे. या दहा दिवसांत ज्यांनी हे देखावे बघितले नाही, त्यांना आणखी काही दिवस या देखाव्यांचा आनंद घेता येणार आहे. यामध्ये रुक्मिणी गणेशोत्सव मंडळ, न्यू आझाद गणेशोत्सव मंडळ यांच्यासह इतर मंडळांचा सहभाग आहे. दरम्यान, यंदा दुष्काळाचे सावट असतानाही मंडळातील गणेशभक्तांमध्ये मात्र चांगलाच उत्साह होता. शहरातील बहुतांश भाविकांना देशाच्या कानाकोपऱ्यात असलेले विविध मंदिर प्रत्यक्ष जाऊन बघणे होत नाही. अशा नागरिकांसाठी शहरातील गणेश मंडळांनी भाविकांसाठी खास हे देखावे तयार केले होते.

विदर्भाच्याराजाची मिरवणूक ऑक्टोबरला : विदर्भाचाराजा म्हणून आेळख असलेला दिनेश बूब यांचा न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाची भव्यदिव्य मिरवणूक ही ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता निघणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांना येथील बाप्पांचे दर्शन करता येणार आहे. पुणेचे ढोल पथक, डीजे, संदल, बाभुळगावचे ताशे, बँजो, दिंडी, पालखी, असा दिमाखदार सोहळा विसर्जनाच्या अमरावतीकरांना अनुभवता येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून या मंडळाची विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी दूरवरून भाविक येतात.

३०सप्टेंबरला होईल रुक्मिणी गणेशोत्सव बाप्पांचे विसर्जन : शहरातीलमध्यभागी असलेल्या रुक्मिणी गणेशोत्सव मंडळाने सायन्सकोर मैदानावर गुजरात येथील अधरक्षाम मंदिर देखावा साकारला आहे. पुणे येथील ढोल पथकाने येथील बाप्पाचे ३० सप्टेंबरला विसर्जन केले जाईल. त्यामुळे भाविकांना ३० सप्टेंबरपूर्वी येथील देखावा बघता येणार आहे. हा देखावा बघण्यासाठी भाविक तुडुंब गर्दी करीत आहे. देखाव्याचे नक्षीदार कलाकुसर आणि गाभाऱ्यातील देखणी मूर्ती बघण्यासाठी भाविकांची मध्यरात्रीपर्यंत गर्दी बघायला मिळत आहे.
.
सामाजिक देखाव्यांवर मंडळांचा अधिक भर
बाप्पांच्या दर्शनासोबत शहरातील काही मंडळांमध्ये सामाजिक संदेश देणारे देखावे साकारण्यात आले होते. दुष्काळामुळे यंदा शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी देखाव्यांसह इतर सामाजिक देखावे बघण्यासाठी नागरिकांनी मंडळांमध्ये गर्दी केली होती. देखाव्यांसोबतच मंडळांमध्ये रक्तदान, निराधारांना सायकल वाटप, आरोग्य तपासणी आदींचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, काही मंडळांनी दानपेटीत जमा झालेली राशी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देऊन आर्थिक मदत केली.

सलग सुटीमुळे मंडळांमध्ये गर्दी
२५ते २७ सलग तीन दिवस सुटी असल्याने शहरातील हे देखावे बघण्यासाठी भाविकांनी तोबा गर्दी केली होती. साधारणत: शुक्रवारपूर्वी मंडळांमध्ये तुरळक गर्दी बघायला मिळाली. मात्र, सलग तीन दिवस सुटी आल्याने भाविकांनी आपल्या परिवारासह शहरातील देखाव्यांचा आनंद घेतला सहकुटुंब बाप्पांचे दर्शन घेतले. दरम्यान, शहरातील काही मंडळांतील बाप्पांचे विसर्जन उशिरा होत असल्याने येथील देखाव्यांचा आनंद शहरातील जिल्ह्यातील गणेश भक्तांना लुटता येणार आहे.

असे होईल विसर्जन
२८ सप्टेंबर : दिल्लीछत्तरपूर कात्यायनी शक्तिपीठ मंदिर देखावा, नीळकंठ व्यायाम मंडळ.
२८ सप्टेंबर : शेतकरीआत्महत्येवर देखावा, राजापेठ स्पोर्टिंग क्लब, राजापेठ
२७ सप्टेंबर : लासूरयेथील आनंदेश्वर मंदिर देखावा, लासूर महोत्सव, आझाद हिंद मंडळ, बुधवारा.
२७सप्टेंबर : मोरगावयेथील मयूरेश्वर मंदिर देखावा, श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळ, श्रीकृष्णपेठ.
३०सप्टेंबर : गजाननमहाराज शेगाव नगरी देखावा, श्री गणेशोत्सव मंडळ, टोपेनगर.