आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganesh Festival Tent Along The Shock Death Of A Child

गणेशोत्सव मंडपात शॉक लागून बालकाचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वेदांत दिघडे)
अमरावती - सार्वजनिक गणेशोत्स मंडळाच्या उत्साही कार्यकर्त्यांचा हलगर्जीपणा एका १३ वर्षीय बालकाच्या जीवावर बेतला आहे. सायंकाळी आरतीच्या वेळेला मंडपात गेलेल्या एका १३ वर्षीय बालकाचा शाॅक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गाडगेनगर परिसरातील राधानगरमध्ये रविवारी रात्री वाजताच्या सुमारास घडली. वेदांत श्रावण दिघडे (१३ रा. गाडगेनगर) असे मृतक बालकाचे नाव आहे. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण राधानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

वेदांत हा शहरातील गणेशदास राठी विद्यालयात सातव्या वर्गात शिकत होता. रविवारी रात्री वाजताच्या सुमारास राधानगरमधील युवा गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात तो गेला होता. या वेळी गणपतीच्या आरतीची तयारी सुरू होती. वेदांत हा मंडपाला लागूनच असलेल्या एका फलकाच्या बाजूने उभा होता. फलकाच्या बाजूने लोखंडी पत्रा होता. या पत्र्याला वेदांतचा स्पर्श होताच वेदांतला विजेचा झटका बसला. यामध्ये तो घटनास्थळीच गंभीर झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सार्वजनिक गणेश मंडळाने गणेश स्थापना करण्याबाबतची पोलिसांकडून परवानगी घेतली नाही. तसेच लाएडस्पीकर वाजवण्यासाठीसुद्धा परवानगी घेतली नाही.


सदर गणेश मंडळाने परवानगी घेतली नाही. वीजसुद्धा शेजारच्या एका घरातून घेतली. त्यामुळे ज्यांच्या घरातून वीज घेतली त्यांच्यासह मंडप उभारणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोमवारी रात्री ३०४ (अ) कलमान्वये गुन्हे दाखल होतील. सोमनाथ घार्गे, पोलिस उपायुक्त.