आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माधानच्या मुलीची केली होती राजस्थानमध्ये विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदूर बाजार - तालुक्यातील माधान येथून दोन महिन्यांपूर्वी अपहरण झालेल्या एका १६ वर्षीय मुलीला राजस्थानमधील रतपुरिया गावातून पोलिसांनी शोधून रविवारी (दि. १३) शहरात आणले. मुलीच्या अपहरणामागे कुणाचा हात आहे, याबाबत पोलिस तपास करत आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या महिलेला १४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
११ आॅक्टोबर रोजी माधान येथून या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. त्याबाबत मुलीच्या पालकांनी १२ ऑक्टोबरला पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान माधान येथील रहिवाशी असलेली, परंतु सध्या राजस्थान येथे राहणारी गीता गोदाराम जाट नामक महिलेने युवतीच्या घरी जाऊन तिच्या लग्नाचे आमिष दाखवल्याची माहिती मुलीच्या आईने तक्रारीत दिली. माहितीच्या आधारे पोलिसांचे एक पथक शोध घेत राजस्थानातील बेलन गावात पोहोचले, परंतु गीता आढळून आली नाही. मात्र अपहरण करण्यात आलेल्या मुलीला रतपुरिया येथील हडमान जाट नामक व्यक्तीला ९० हजारांमध्ये विकले असून त्याने मुलीशी लग्न केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी रतपुरिया गाठले असता, हडमान जाट हा डिसेंबरपासून गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शुक्रवारी मुलीला ताब्यात घेतले. रविवारी मुलीसह पोलिस शहरात पोहोचले. जबाबामध्ये मुलीने आपबिती कथन केली. पोलिस हडमान जाट याच्यासह त्याचा भाऊ चनाराम जाट अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. ही कारवाई पीएसआय संदीप आगरकर, संजय इंगळे, राजकुमार जैन, कपिल खडसे, महिला पोलिस कल्याणी आंबेकर यांनी पार पाडली.
अटक केलेल्या महिलाआरोपीसह तपास पोलिस अधिकारी कर्मचारी.
बातम्या आणखी आहेत...