आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाह समारंभाला लागला ब्रेक, तरीही खरेदीला आलायं वेग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - सराफा व्यवसायाला सद्य:स्थितीत ‘सोन्याचे’ दिवस आले आहेत. अधिक मास, सोबतच गुरुपुष्पामृत असा शुभाशुभ योग साधत शहरात मोठ्या प्रमाणात सोन्याची उलाढाल झाल्याची माहिती आहे. सोन्यासोबतच ‘गुरुपुष्पामृत’च्या मुहूर्तावर रियल डायमंडचीदेखील मोठी मागणी बाजारात दिसून आली. विवाह समारंभांना ब्रेक असला, तरी सोने खरेदीचा वेग चांगलाच वाढल्याचे चित्र आहे.

सोने खरेदी सर्वांसाठी शुभ योग असतो, भविष्यातील गुंतवणूक म्हणूनदेखील अनेकजण सोने खरेदी करतात. पूर्वीपेक्षा कमी दरामध्ये सोने मिळत असेल, तर त्यापेक्षा कोणताच योग मोठा नसतो. सराफा बाजारातदेखील तीच स्थिती निर्माण झाली आहे. एरव्ही पावसाळा सुरू झाला की, सोने खरेदीला ब्रेक लागत असल्याची स्थिती होती. मात्र, यंदा चित्र पूर्णपणे पालटले अाहे. सोने खरेदी कमी होण्याऐवजी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाजारात उलाढाल वाढत आहे. विवाह समारंभाप्रसंगी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली जाते.

मात्र, विवाहाचे मुहूर्त नसताना सराफा बाजार फुलणे, ही या व्यवसायाच्या दृष्टीने चांगले सूचक संकेत आहे. पारंपरिक सोन्याचा व्यवसाय करणाऱ्यांसोबत शहरात अनेक नामांकित शो रूम आरंभ झाले आहेत. मागील काही एक वर्षाच्या तुलनेत सोन्याचे दर सध्या पाच ते सहा हजार रुपयांनी कमी झाले आहेत. या संधीचा लाभ घेत अनेकजण सोने खरेदीला गुंतवणुकीकडेदेखील पाहत आहेत. पवित्र अधिक महिन्याने सराफा व्यावसायला चांगले दिवस आणण्याचे कार्य केले आहे. सोने खरेदीकडे गरजेपेक्षा गुंतवणूक म्हणून अधिक पाहिले जाते. ज्वेलर्सची मोठे शो रूम शहरात मागील एका वर्षात आरंभ करण्यात आली. यावरून अमरावती सराफा व्यवसायाच्या दृष्टीने चांगली बाजारपेठ असल्याचे निदर्शनास येत आहे.

पावसाने तब्बल एक महिन्यापासून दडी मारली असून, शेतीतील संपूर्ण कामे थांबली आहेत. शेतीच्या मशागतीकरिता शेतकऱ्यांकडून या काळात सोने गहाण ठेवले जात होते. मात्र, मागील वर्षीचे गहाण असलेले सोने शेतकऱ्यांकडून अद्याप सोडवणे शक्य झाले नसल्याची माहिती आहे. मागील वर्षी प्रचंड भाव असल्याने ग्राहकांकडून मागणीदेखील मंदावली होती. मात्र, भावात घसरण झाल्याने मध्यम वर्ग, नोकरदार तसेच व्यापाऱ्यांच्या दृष्टीने गुंतवणूक सोने खरेदी एक पर्वणी ठरत आहे.

मागील काही वर्षांच्या तुलनेत सोन्याचे दर कमी झाले, गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. बाजारात सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांची संख्यादेखील वाढली आहे. गुरुपुष्पामृत अधिक महिन्याचा योग साधत सराफा बाजारात ग्राहक वाढले. सद्या दर कमी असूनही, दर कमी होण्याची ग्राहक वाट पाहतात. मात्र, आणखी भाव खाली येण्याची वाट पाहणे चुकीचेदेखील ठरू शकते.

अधिक महिन्यात वाढले ग्राहक
गुरुपुष्पामृत अधिक महिन्याचा योग साधत सर्वाधिक सोने खरेदी करण्यात आली. सोन्यासोबतच रियल डायमंड खरेदीकडेदेखील अमरावतीकरांचा कल वाढला आहे. पारंपरिक दागिने ग्राहकांकडून खरेदी केले जात असून, गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. एकता स्वर्ण संजय बीसी योजनेलादेखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दर गतवर्षीच्या तुलनेत कमीच
सोनेव्यवसायात चढ-उतार नेहमी होत राहतो, सद्य:स्थितीत सोन्याचे दर मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे. या व्यवसायातील जाणकारांच्या मते मागील आठ वर्षे म्हणजेच २००८ नंतर सोन्याच्या भावाने नीच्चांक गाठला आहे. दरात घसरण झाल्याने सोने खरेदीचा वेगदेखील वाढल्याचे चित्र आहे.

‘गुरुपुष्पामृत’च्या मुहूर्तावर डायमंडची मागणी
२५ ते २६ हजारांपर्यंत भाव : अमरावतीशहरात सोन्याचे दर २५ हजार ते २६ हजार रुपयांच्या दरम्यान प्रती दहा ग्रॅम असल्याची माहिती आहे. सोन्याच्या कॅरेटनुसार भावात बदल दिसून येतो. सोन्याची बाजारपेठ राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला जोडली असल्याने प्रत्येक दिवशी सोन्याच्या भावात बदल होत असतो.

बातम्या आणखी आहेत...