आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gov. Give Grazing land For Silk Project In Amravati

रेशीम उद्योगासाठी देणार गायरान जमीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रेशीम उद्योगाच्या विकासाचा आढावा घेतला. - Divya Marathi
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रेशीम उद्योगाच्या विकासाचा आढावा घेतला.
अमरावती- रेशीमउद्योगाला चालना देण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य करण्यात येत आहे. या उद्योगास मोठ्या प्रमाणावर वाव आहे. हे लक्षात घेऊन बचत गटाच्या मार्फत रेशीम उद्योगाचा आदर्श फार्म उभारण्यासाठी शासनाची गायरान जमीन उपलब्ध करुन देणार असल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी सांगितले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ना. पोटे यांच्या अध्यक्षतेखाली रेशीम उद्योगाला ग्रामीण भागात चालना देण्यासाठी शासनाची गायरान जमीन उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि रेशीम उद्योग विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली.त्यावेळी पोटे बोलत होते. जिल्हाधिकारी किरण गित्ते, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातूरकर प्रामुख्याने उपस्थित होते. पोटे म्हणाले की, रेशीम उद्योग उत्पन्न वाढीसाठी चांगला वाव आहे. जिल्ह्यात या उद्योगासाठी तुती लागवड आवश्यक आहे. अशा लागवडीसाठी मुबलक जमीनही उपलब्ध आहे. पाहिजे त्या प्रमाणात शेतकरी पुढे येत नाही. केंद्र राज्य शासनाचे अनुदानही उपलब्ध आहे. सुरुवातीला रेशीम उद्योग अधिकाऱ्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली बचत गटाच्या मार्फत शासनाची गायरान जमिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी शासनामार्फत सोलार पंप उपलब्ध करुन देण्यात येईल. उत्पादित झालेल्या रेशीम कोष विक्रिची व्यवस्थाही करण्यात आली आहे. इतरांनीही त्यांच्या खासगी जागेत असे प्रकल्प उभा करुन मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा यासाठी प्रायोगिक तत्वावर बचत गटामार्फत शासनाच्या गायरान जमिनीवर (ई-क्लास) प्रत्येक तालुक्यात एक या पध्दतीने आदर्श रेशीम उद्योग फार्म तयार करण्यात येणार आहे.

२२ लाख रुपये करणार मंजूर
जिल्हाधिकारीजिल्हाधिकारी गित्ते म्हणाले जिल्ह्यात १६५ एक्करवर जुनी तुती लागवड आहे. धारणी तालुक्यात २०० एक्कर, चांदूर बाजार तालुक्यात २०० एक्कर उर्वरित सर्व तालुक्यात मिळून २०० अशी एकूण ६०० एक्कर मध्ये तुतीची लागवड करण्याचे उद्दिष्ठ पूर्ण झाले असून तुती वृक्ष लागवड बाकी आहे. आदर्श प्रकल्पासाठी प्रत्येक तालुक्यात २० एक्कर जमिन वापरण्यात येणार आहे. शासनाकडून सोलार पंप देण्यात येईल. इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी आदर्श रेशीम उद्योग उभारण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत २२ लाख रुपये या कामासाठी मंजूर करण्यात येणार आहे.