आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यापक महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला भीषण आग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- गोधणी रोडस्थित जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या आवारातील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला आज, दि. ११ जुलै रोजी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये दहा हजारांवर पुस्तकांचा कोळसा झाल्याची माहिती आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी उपस्थितांकडून केल्या जात आहे.

जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या आवारातच शासकीय अध्यापक महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाचे ग्रंथालयसुद्धा आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास ग्रंथालयाला अचानक आग लागली. यावेळी डायटमधील बाबू, चपराशी आदींना धूर निघत असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी लगेच पाहणी केली असता, आगीचे लोळ निघत होते. दरम्यान, यातील उपस्थितांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यावेळी अग्निशमन दलाच्या वाहनाने डायट महाविद्यालय गाठले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीचे रौद्ररूप असल्यामुळे चक्क चार बंब पाणी लागले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तोपर्यंत दहा हजारांवर पुस्तकांचा कोळसा झाला होता. थोड्याफार प्रमाणातही पुस्तके आगीपासून वाचू शकली नाही.
अध्यापक महाविद्यालयातील ग्रंथालयाला लागलेली आग.