आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील एक हजार ७०० शेतकऱ्यांना मिळणार सौरपंप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शेतकरीआत्महत्याग्रस्त अमरावती जिल्ह्यासह उर्वरित पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र राज्य शासनाने सौरपंप देण्याची योजना तयार केली आहे. या योजने अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील हजार ७०० पात्र शेतकऱ्यांना सौरपंप वितरणाचे लक्ष्यांक ठरवण्यात आले असून, ज्या गावात अद्यापही वीज पोहोचलेली नाही, अशा गावातील शेतकऱ्यांना सौरपंप देण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

नियमित वीजपुरवठा किंवा वीजजोडणी नसल्यामुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. जिल्ह्यातही असा काही भाग आहे. काही शेतकऱ्यांकडे जलस्रोतांची व्यवस्था आहे, मात्र वीजजोडणीअभावी त्यांना सिंचन करता आलेले नाही. पर्यायाने या बाबींचा शेती उत्पादनावर परिणाम होतो. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज देण्यासाठी शासन अनुदान देते. औष्णिक वीजनिर्मितीमुळे पर्यावरणाचाही ऱ्हास होतो, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाची सोय आहे, मात्र वीज नाही किंवा अलीकडच्या काळात मिळणे शक्य नाही, अशा शेतकऱ्यांना सौरपंप देण्यासाठी शासनाने निर्णय घेतला.

या योजने अंतर्गत सौरपंप देण्यासाठी लाभार्थींची निवड करताना काही निकष ठरलेले आहे. त्यामध्ये पाच एकरापेक्षा कमी जमीन असलेले शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण झालेल्या गावातील शेतकरी, वीजजोडणीसाठी वन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, महावितरणकडे वीजजोडणीसाठी रक्कम भरली आहे, मात्र जोडणी मिळाली नाही किंवा अलीकडच्या काळात मिळण्यासाठी तांत्रिक अडचण असलेले शेतकरी आणि धडक सिंचन योजने अंतर्गत विहिरींचा लाभ घेतलेले शेतकरी असे निकष आहे. सदर लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये महावितरणचे अधीक्षक अभियंता, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांचा समावेश आहे. सौरपंप घेण्यासाठी इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांनी यापूर्वी शेतात वीजजोडणी घेतलेली नसावी, जर त्याने वीजजोडणी घेतली असेल तर त्याला सौरपंप घेता येणार नाही, असेही महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.

लाभार्थ्यांनाद्यावे लागणार केवळ टक्के
यासौरपंप घेणाऱ्या लाभार्थ्यांना पंपच्या एकूण किमतीच्या टक्के हिस्सा भरणा करावा लागणार आहे. याच वेळी राज्य शासन टक्के, केंद्र शासन ३० टक्के आणि उर्वरित ६० टक्के महावितरण कर्ज काढून भरणार आहे. या पंपची आगामी दहा वर्ष शेतकऱ्यांना वाॅरंटीसुद्धा मिळणार आहे.

लाभार्थ्यांनी घ्यावा लाभ
जिल्ह्यात हजार ७०० सौरपंप देण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी असलेले निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या उपविभागीय, विभागीय किंवा अधीक्षक अभियंता कार्यालयात संपर्क साधावा. अधिकाधिक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. निवड झालेल्या लाभार्थ्यांना पंपाच्या एकूण किमतीच्या पाच टक्के रक्कम भरून सौरपंप मिळणार आहे. दिलीपघुगल, अधीक्षकअभियंता, महावितरण.

..तर वीजजोडणी नाही
ज्या शेतकऱ्यांना सौरपंप दिले जाणार आहे, त्यांना महावितरणकडून वीजजोडणी मिळणार नाही. तसेच सध्या ज्यांच्या शेतात वीजजोडणी झालेली आहे, त्यांना सौरपंप दिल्या जाणार नाहीत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात अजूनही ४१ गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही. मात्र, या भागात जलसिंचनासाठी पुरेशी व्यवस्था आहे. त्यामुळे जिल्ह्यात मेळघाटातील या ४१ गावांतील शेतकऱ्यांना सौरपंप देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त अमरावती जिल्ह्यासह उर्वरित पाच जिल्ह्यांचा योजनेत समावेश