आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाव मोठे लक्षण खोटे, एका परिचारिकेकडे ४० ते ५० रुग्णांच्या सेवेचा आहे भार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरासह जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेमध्ये सुपरस्पेशालिटी, जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरिन) या तीनही रुग्णालयांची महत्त्वपूर्ण भूमिका असून, येथे रुग्णांची बारमाही गर्दी असते. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असताना रुग्णांवर उपचार करणारी पर्याप्त यंत्रणा उपलब्ध नसल्याने ही आरोग्य यंत्रणा रिक्त पदांमुळे रुग्णशय्यावरच पडली आहे. दरम्यान, शहरासह जिल्ह्याचा विकास हा मूलभूत सोयी-सुविधांवर अवलंबून आहे. या मूलभूत सुविधांमध्ये आरोग्य यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. परंतु, जिल्ह्यातील याच आरोग्य यंत्रणेचा डोलारा रिक्त पदांमुळे दिवसेंदिवस ढेपाळत चालला आहे.

रुग्णांना पाहिजे तशी सुविधा मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदांमुळे रुग्णालयाचा मुद्दा ऐरणीवर आला. जिल्हा सामान्य रुग्णालय डफरिन रुग्णालयातच भीषणच परिस्थिती आहे. येथील रुग्णालयात एका परिचारिकेला ४० ते ५० रुग्णांची सेवा करावी लागत असल्याचे भीषण वास्तव आहे. मात्र, शासनाला याचे काहीच सोयरसुतक नसून जसा कारभार सुरू आहे, त्याच पद्धतीने काम करण्यात येत आहे. परंतु, या रिक्त पदांमुळे कामाचा बोजा मात्र चांगलाच वाढला आहे. एका परिचाकेला संपूर्ण वॉर्ड बघावा लागत असल्याने रुग्णसेवा प्रभावित होत असल्याचे चित्र आहे. रुग्णसंख्यामागे सध्या रुग्णालयात जी मंजूर पदे आहेत त्यापेक्षाही अधिक कर्मचाऱ्यांची नितांत आवश्यकता आहे.

परंतु, रुग्णालयातील जी मंजूर पदे आहेत तीच शासनाने पूर्णपणे भरलेली नाहीत, तर मग जादा कर्मचारीसंदर्भात बोललेलेच बरे, असे सूत्रांनी नमूद केले.
म्हणूनहोते चिडचिड : एकापरिचारिकेला ५० रुग्णांकडे लक्ष द्यावे लागते. अशात परिचारिका त्यांचे काम व्यवस्थितपणे पार पाडतात. पण, कधी कधी रुग्णांकडे फारसे लक्ष दिल्याने रुग्णांच्या नातेवाइकांकडूनही आरडाआेरड सुरू होते. त्यामुळे सगळेच करूनही ऐकावे लागत असल्याने परिचारिकांची चिडचिड होत असल्याचे त्यांनी कबूल केले.

त्यात परिचारिकांनी सुटी घेतल्यास कामाचा बोजा अधिक वाढतो, त्यामुळे सुटी घेता सतत काम करावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शहरातील तीनही रुग्णालयांतील रिक्त पदे भरली, तर रुग्णांकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देता येईल. रुग्णाला वेळेवर चांगल्याप्रकारे सेवा मिळेल. शिवाय कुठल्याही कर्मचाऱ्यावर ताण येणार नाही. आरोग्य यंत्रणेचा डोलारा टिकून राहील. रुग्णालयाच्या नूतनीकरणासोबत मनुष्यबळाची नितांत आवश्यकता आहे. जेणेकरून आरोग्य यंत्रणेत सुधार येईल.

पुढे काय?
जिल्हा स्त्री रुग्णालय
वर्ग मंजूर पदे भरलेली रिक्त
वर्ग-१ ०५ ०२ ०३
वर्ग-२ २० १९ ०१
वर्ग-३ ३४ २६ ०८
वर्ग-४ ५३ ४७ ०६
अधिसेविका८३ ६९ १४
एकूण १९५ १६३ ३२

प्रस्ताव पाठवला आहे
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण राऊत, डफरिनचे डॉ. अरुण यादव आणि सुपरस्पेशालिटीचे डॉ. श्यामसुंदर निकम यांच्याशी रिक्तपदांसंदर्भात माहिती घेतली असता, रिक्त पदांबाबात शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, तत्काळ ही पदे भरली जातील.

सुपरस्पेशालिटी रुग्णालय
वर्ग मंजूर पदे भरलेली रिक्त
वर्ग-१ १० ०३ ०७
वर्ग-२ २६ १७ ०९
वर्ग-३ १६६ ७९ २७
वर्ग-४ १७७ १२६ ५१
एकूण ३७९ २२५ १५४
जिल्हा सामान्य रुग्णालय
वर्ग मंजूर पदे भरलेली रिक्त
वर्ग-१ २२ ०७ १५
वर्ग-२ ३८ ३१ ०७
वर्ग-३ ३०३ २३२ ७१
वर्ग-४ २१४ १५४ ६०
एकूण ५७७ ४२४ १५३
अधिसेविका१९५ १५९ ३६
बातम्या आणखी आहेत...