आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धान्यासाठी रुग्णवाहिका; मात्र रुग्ण बैलगाडीमधून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा; महाराष्ट्रात कुपोषणासाठी चर्चेत राहणारे मेळघाटातील आरोग्य सेवेवर शासन कोट्यवधी रुपयाचा खर्च करत असल्याचे बोलले जाते. मात्र, वास्तवात मेळघाटातील चित्र दुसरेच असून, शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधेचा लाभ आदिवासी रुग्णांना कमी इतर कामासाठीच जास्त होताना दिसून येत आहे. याबाबत आदिवासी बांधवांनी संताप व्यक्त केला आहे.
मेळघाट अंतर्गत येणाऱ्या चिखलदरा धारणी तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच अचलपूर-धारणी उपजिल्हा रुग्णालय किंवा अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या सेवेकरिता आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. मात्र आदिवासी रुग्णांना उपचारासाठी नाईलाजास्तव बैलगाडी किंवा छकड्यांचाच आधार घ्यावा लागत आहे.
परिणामी आकस्मिक परिस्थितीत वेळेवर उपचार मिळू शकल्याने अनेक आदिवासींना प्राणांना मुकावे लागते. यामुळे या पुरातन साधनांमुळे अनेक आदिवासींना आपला जीव गमवावा लागतो. नुकतीच सप्टेंबर रोजी मेळघाटातील आरोग्य विभागात एमएच २७ एए ५१३२ क्रमांकाची रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आली. मात्र रुग्णासाठी देण्यात आलेली ही रुग्णवाहिका सेवा सोडून इतर कामांसाठी वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

एकीकडे ही रुग्णवाहिका रुग्णांएवेजी खासगी दुचाकी इतर साहित्याची वाहतूक करताना आढळून आली, तर दुसरीकडे शहरातीलच खासगी दवाखान्यात आदिवासी रुग्णाला उपचारासाठी बैलगाडीतून आणल्या जात होते. ही दोन्ही चित्रे मेळघाटातील आरोग्य सेवेची भीषणता दर्शविणारे आहे. मेळघाटातील चिखलदरा धारणी तालुक्यात ११ प्राथमिक केंद्र आहेत. या सर्व केंद्रांना प्रत्येकी दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना एकेक तसेच १०८ क्रमांकावर सेवा देणाऱ्या तीन रुग्णवाहिकांसह भरारी पथकाच्या ते १० रुग्णवाहिकांवर कोट्यवधी रुपये आरोग्य विभाग खर्च करीत आहे. एकूण ३५ रुग्णवाहिकांची सुविधा असूनही त्याचा उपयोग मात्र रुग्णांसाठी होताना दिसून येत नाही.

संबंधित अधिकारी उचलेना फोन
जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ. नितीन भालेराव यांच्याशी याबाबत वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधला, परंतु त्यांनी एकदाही फोन उचलून माहिती देण्याची तसदी घेतली नाही.

३५ रुग्णवाहिकांवर लाखोंचा खर्च
मेळघाटातीलआरोग्य सेवेकरता शासनाने प्रावधान करुन प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन-दोन रुग्णवाहिका दिल्या आहेत. अशा एकूण २२ रुग्णवाहिका तर प्रत्येक तालुका अधिकाऱ्याला एक रुग्णवाहिका अशा दोन तर १०८ क्रमांकाच्या तीन तर भरारी पथकाच्या ते १० रुग्णवाहिकेवर लाखोंचा खर्च होत असताना सेवा मिळत नसल्याचे चित्र आहे.

मेळघाट अंतर्गत येणाऱ्या दुर्गम भागात नाही सेवा
मेळघाटअंतर्गत येणाऱ्या दोन्ही तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून गावांचे अंतर जास्त आहे. अनेक गांवे दुर्गम भागात आहेत. या गावांमध्ये आदिवासी रुग्ण आजारी झाल्यास त्याला त्वरीत उपचार देण्याकरीता रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नसल्याने रुग्णांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. अनेकदा या रुग्णवाहिकांशी संपर्कदेखील होत नाही.
रुग्णांना मात्र छकड्यातून न्यावे लागत आहे.