आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Guidance To The Students Of Collector Kiran Gitte

यशासाठी मेहनत, संयम आवश्यक - क‍िरण ग‍ित्‍ते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युनिक अॅकेडमीच्या गौरव सोहळ्याला विद्यार्थ्यांसह मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. - Divya Marathi
युनिक अॅकेडमीच्या गौरव सोहळ्याला विद्यार्थ्यांसह मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
अमरावती - जो ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करतो, यश हे त्याच्यावरच अवलंबून असते. विद्यार्थी हा त्याच्या सुप्त गुणांमुळेच त्याचे शिखर गाठतो. केवळ अभ्यास करून होत नाही. जो अभ्यास आपण करतो, तो गुणवत्तेचा असला पाहिजे. यश हे कोणालाही प्राप्त करता येते. पण, ते मिळवण्यासाठी मेहनत, संयम, शिस्त महत्त्वाची आहे. त्यामुळे स्वत:मधील अभ्यासू व्यक्तीचा शोध घ्या. मनातील न्यूनगंड बाजूला सारा, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी रविवारी (दि. २६) केले.
युनिक अॅकेडमीतर्फे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात यूपीएससी एमपीएससी परीक्षेत उच्च पदावर नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा घेण्यात आला. त्या वेळी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना गित्ते यांनी महत्त्वाच्या टिप्स दिल्या. आपण नोकरी करून कसे या उच्च पदावर आलो कशा पद्धतीने अभ्यास केला, याचा प्रवास त्यांनी सांगितला. याप्रसंगी नागालँडच्या आयएएस अधिकारी भाग्यश्री बानायत, अॅड. गणेश हलकारे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप काळे, फॉरेन्सिक विभागाचे उपसंचालक विजय ठाकरे, युनिक अॅकेडमीचे संचालक प्रा. अमोल पाटील इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगून मोलाचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. अमोल पाटील यांनी केले.सुप्रिया पाटील यांनी कार्यक्रमाचे संचालन करून उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी युनिक अॅकेडमीचे स्वयंसेवक, विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांचा झाला सत्कार
आयआरएसस्वप्निल वानखडे, उपजिल्हाधिकारी स्वप्निल तांगडे, रोहित भारुखा, जयंत मालवे, मुकुंद भक्ते, ज्ञानेश्वर टाकरस, परमानंद गावंडे, शिल्पा नगराळे, छोटू जाधव, गणेश मोरे, प्राजी राजूरकर, अनिकेत कडू, प्रकाश तायडे, नम्रता जाधव, निशा खोब्रागडे, प्रनिल पाटील, संदीप बोरकर, सूरज सुसतकर, युवराज राठोड, आशिष शिंदे देवेंद्र केमेकर अशा एकूण २० अधिकाऱ्यांचा या वेळी सत्कार घेण्यात आला. हे सर्व विद्यार्थी यूपीएससी एमपीएससी परीक्षेत उच्च पदावर नियुक्त झाले आहेत. मान्यवरांनी पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.
योग्य नियोजन करा : बानायत
कुठलेहीयश हे सहजासहजी मिळत नाही. यासाठी त्यांनी यशाची पायरी कशी राहते, यासंदर्भात इत्यंभूत माहिती दिली. यशाचा पहिला टप्पा म्हणजे, ध्येय निश्चित करणे. दुसरा टप्पा हा यशाच्या दिशेने वाटचाल करणे. तिसरा टप्पा म्हणजे, त्या ध्येयाची सुरुवात आतापासून करणे. पुढे नियोजन, कठोर मेहनत संयम अशा यशाच्या पायऱ्या असल्याचे नागालँड येथील जिल्हाधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सांगितले. भाग्यश्री यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रश्न-उत्तरे विचारून मोकळीक संवाद साधला. मी आयएएस कसे झाले, यासंदर्भात त्यांनी आपला जीवनप्रवास सभागृहात उलगडला. सत्कार समारंभानिमित्ताने त्या शहरात आल्या होत्या. विशेष म्हणजे, दाेन वर्षांपूर्वी त्यांचा सत्कार घेण्यात आला होता.