अमरावती- विक्रीसाठी आणलेल्या देशी कट्ट्यासह एक आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि.२४) रात्री नऊ वाजताच्या सुमारास सापळा रचून ताब्यात घेतले. नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुर्शीदपुरा परिसरातील मैदानात केलेल्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
एक व्यक्ती मंगळवारी रात्री खुर्शीदपूरा परिसरातील मैदानात असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ देशी कट्ट्याचा व्यवहार करण्यासाठी येत आहे, अशी खात्रीलायक माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मैदान पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचला होता. रात्री वाजताच्या सुमारास मैदानाच्या दिशेने एक जण आला.त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडले. तसेच त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशीकट्टा मिळून आला. यावेळी मात्र काडतूस त्याच्याकडे मिळून आले नाही. या कारवाईमध्ये गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम, एपीआय गोपाल उपाध्याय, संजय बाळापुरे, संतोष शिखरे, प्रमोद खरबडे, जुनेद, दीपक दुबे, दीपक खाणीवाले, पंकज यादव, सुधीर गुडदे, धीरज जोब यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
२५हजारांमध्ये ठरला होता व्यवहार : पोलिसांनीजप्त केलेला देशी कट्टा गावठी बनावटीचा असून या देशी कट्ट्याचा व्यवहार २५ हजार रुपयात ठरला होता. ही रक्कम घेऊन घेणारा मैदानात पोहाेचताच पोलिसांनी सापळा रचून कट्टा जप्त केला. हा कट्टा त्याने कोणाकडून आणला, किती रुपयात आणला, यासह अन्य महत्वाची माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिस करणार आहे.
देशी कट्टा जप्त
^खुर्शीदपुराभागातदेशी कट्ट्याचा व्यवहार होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती, त्या आधारे आम्ही सापळा रचला होता. रात्री वाजताच्या दरम्यान एकाला आम्ही देशी कट्ट्यासह ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. प्रमेश आत्राम, पोलिसनिरीक्षक, गुन्हे शाखा,अमरावती.
पहिल्या स्थळात ऐनवेळी केला बदल
देशीकट्ट्याची विक्री करण्यासाठी येणाऱ्याने पहिल्यांदा हा व्यवहार ट्रान्सपोर्टनगर भागात करणार असे सांगितले होते. मात्र पोलिस मागावर असल्याची भणक लागल्यामुळे त्याने ऐनवेळी खरेदीदाराला खुर्शीदपुरा भागात बोलवले. याठिकाणी मात्र पोलिस त्याच्या पूर्वीच तेथे सापळा रचल्याने तो देशी कट्ट्यासह जाळ्यात सापडला.