आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"गुरुकुंज'चे पाणी खळखळते आठ वर्षांपासून कागदावरच! १७ हजार एकर जमीन तहानलेलीच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती; तिवसा तालुक्यातील १६ गावकऱ्यांचे हिरवे स्वप्न साकारणारा जिल्ह्यातील एकमेव गुरुकुंज उपसा सिंचन प्रकल्पाचे पाणी तब्बल आठ वर्षांपासून केवळ कागदावरच खळखळत आहे. लालफितीच्या अनेक बांधांमुळे या प्रकल्पाचे पाणी साधे पाइपमध्येही घुसल्याने १७ हजार एकरवर जमीन तहानलेली आहे.
पहिल्या टप्प्याच्या कामाची चार वर्षांची मुदत संपली तरी फक्त प्रकल्पाचे पाइप पोहोचवण्यापर्यंतच गती येऊ शकली आहे. गतिमान शासनाच्या कार्यकाळातही या प्रकल्पाला गती येऊ शकत नसल्यामुळे हा प्रकल्प केव्हा पूर्ण होणार, असा सवाल आता शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
चीनने शांघाय शहरात ४८ तासांत उड्डाणपूल बांधून विक्रम केल्याची चित्रफीत सोशल मीडियावर नुकतीच व्हायरल झाली होती. याशिवाय जपान, चीन इतर देशांनी विक्रमी वेळेत बांधलेले जलसेतू, इमारती, उड्डाणपुलाचे छायाचित्र, माहिती इंटरनेट, व्हाॅट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून जगभर पोहोचले. संबंधित देशातील गतिमान प्रशासन, त्यासाठी राबणाऱ्या यंत्रणेमुळे आपल्या देशातही अशी काही जादू सध्यातरी दृष्टीपथात दिसत नाही. याचाच एक भाग तिवसा तालुक्यातील गुरुकुंज उपसा सिंचन प्रकल्प ठरला आहे. तिवसा तालुक्यातील गुरुकुंज उपसा सिंचन योजना २००७ - ०८ मध्ये मंजूर झाली होती. मंजूर झालेल्या पहिल्या टप्प्यातील शीर्ष कामांची चार वर्षांची मुदत संपली तरी या प्रकल्पाचे फक्त पाइपच पोहोचू शकले आहे. या योजनेतील महत्त्वाचा घटक असलेले पंप बदलण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून त्यासंदर्भात झालेल्या हालचाली संथ आहेत. त्यामुळे योजनेचे पाणी कागदावर अडले आहे. प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे आदेश सप्टेंबर २०११ मध्ये देण्यात आले होते. त्याच वर्षी १८ डिसेंबरला तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामाचा शुभांरभ झाला. अप्पर वर्धा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी उपसा करून ते दास टेकडी, गुरुकुंज मोझरी या ठिकाणी आणायचे आहे. येथून परिसरातील १६ गावांच्या शेतीला सिंचनासाठी पाणी पुरवण्यात येणार आहे. यासाठी दास टेकडीपासून पाच किलोमीटर अंतर असलेल्या कालव्यातून पाणी दास टेकडीपर्यंत वाहून आणण्यासाठी पाइपलाइन टाकणे, कालव्यावर ज्या ठिकाणावरून पाण्याचा उपसा करायचा आहे त्या ठिकाणावर पाणी उपसा करण्यासाठी आवश्यक असलेले विद्युत पंप बसवणे त्या अनुषंगाने इतर महत्त्वाची कामे २५ कोटी रुपयात करायची होती. हे काम करण्यासाठी चार वर्षांची मुदत होती. कालव्यावर पाणी उपसण्यासाठी प्रत्येकी ८८६ एचपीचे दोन पंप बसवण्यात येणार होते. हे पंप बसवण्यापूर्वी स्थानिक जलसंपदा विभागाने पंपगृहाचे मऊ भूस्तरावरील पायव्याचे संकल्पनसाठी प्लेट उर्वरितपान.

नवीन वर्षात होणार कामाला प्रारंभ
पाणीउपसाकरण्यासाठी पंपगृह बांधकाम करणे आवश्यक होते. मात्र, त्या ठिकाणची भूस्तरीय परिस्थिती लक्षात घेता मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेने सबमर्सिबल पंप लावण्याबाबत सूचना दिल्या. त्यामुळे आता या सूचनेला स्थायी समितीची मंजुरात आवश्यक आहे. ती अद्याप मिळाली नाही. मात्र, लवकरच मंजुरात घेऊन आम्ही जानेवारीमध्ये कामाला सुरुवात करू. तसेच शीर्ष कामांसाठी दिलेली चार वर्षांची मुदत संपली असल्यामुळे मुदत वाढीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. सध्या या कामासाठी लागणारे ४३५ पाइप आणलेले आहेत. एस. टी. वानरे, शाखाअभियंता, जलसंपदा विभाग, अमरावती.

दृष्टिक्षेपात प्रकल्प
पाणी वहनासाठी लागणारे पाइप : ४३५
कालवा ते वितरण कुंड अंतर : कि.मी ४० मीटर
वीजपंपांची संख्या : सबमर्सिबल
सिंचन क्षमता :७ हजार १०९ हेक्टर
पाइपचा व्यास : ११०० मिमी
कार्यारंभ दिनांक : २३ सप्टेंबर २०११
निविदा किंमत : २५.७८ कोटी
तांत्रिक किंमत (शीर्ष कामे) : ३९.७८ कोटी
प्रशासकीय मान्यता मत : २१२.६३ कोटी
प्रथम टप्पा काम पूर्ण करण्यासाठी मुदत : वर्ष
बातम्या आणखी आहेत...