आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने-चांदी खरेदीसाठी आज गुरुपुष्यामृत उत्तम योग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गुरुपुष्यामृतहा योग सोने चांदी खरेदीसाठी उत्तम योग मानला जातो. यामुळे गुरुवारी सराफा बाजारासह शहरातील नामांकित प्रतिष्ठानांमध्ये नागरिकांची झुंबड राहणार असल्याचे संकेत सराफा व्यावसायिकांनी दिले आहेत. गुरुपुष्यामृत योगानिमित्त बाजारपेठेत ग्राहकांसाठी सोने-चांदीची विविध आभुषणे विक्रेत्यांनी तयार केली आहेत. विशेष म्हणजे, सोने-चांदीचे भावही कमी असल्यामुळे खरेदीपासून दूर असलेले ग्राहक या निमित्ताने खरेदी करतील, असा आशावाद एकता आभुषणचे व्यवस्थापक विजय मोटवानी यांनी व्यक्त केला आहे.
अधिक महिन्यातला गुरुपुष्यामृतचा योग हा शुभ असल्याने बाजारपेठ सोने-चांदी खरेदीसाठी गुरुवारी नागरिकांची झुंबड राहणार असून, काही ग्राहकांनी अॅडव्हॉन्स बुकिंगदेखील केली असल्याचे प्रतिष्ठानच्या मालकांनी सांगितले.

इतर कार्यापेक्षा दागिने खरेदीसाठी हा दिवस शुभ उत्तम असल्याने या दिवशी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. या निमित्ताने सराफा बाजारपेठेत नेहमीपेक्षा रटाळ दागिन्यांपेक्षा अॅन्टिक दागिने ग्राहकांना यानिमित्ताने खरेदी करता येणार आहे. गुरुपुष्यामृत योग निमित्ताने हे खास दागिने तयार करण्यात आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

नागरिकांमध्ये उत्साह
गुरुपुष्यामृतयोगनिमित्त नागरिकांमध्ये सोने-चांदी खरेदीसाठी उत्साह आहे. बऱ्याच दिवसांपासून सोने-चांदी खरेदीपासून दूर असलेला ग्राहक वर्ग स्वत:हून खरेदीला येत आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांसाठी अॅन्टिक साहित्य विक्रीसाठी आहेत. योगायोगाने सोने-चांदीचे भावही कमी असल्याने शहरातील काही ग्राहकांनी अॅडव्हान्स देऊन दागिने बुक केले आहेत. रजनीशकोठारी, कोठारी ज्वेलर्स.

काय आहे नवीन : जिजाऊमाळ, श्रीमंती माळ, बकुळी माळ, शाही माळ, टेंपल माळ, अॅन्टिक माळ, अॅन्टिक बँगल्स, टेंपल बाजूबंद, डायमंडजडित अंगठी, पारंपरिक माळ, कलर स्टोन्ड डायमंड, ब्रेसलेट, अॅन्टिक पेंडल, चंद्रहार, नेकलेसयासह अँन्टिक सोने-चांदीचे आभुषण गुरुपुष्यामृत योगनिमित्त बाजारपेठेत विक्रीसाठी आहे. सराफा बाजारात हे आभुषणे खरेदी करता येणार आहे.

पुरुषोत्तम मासानिमित्त गुरुपुष्यामृतचा योग हा उत्तम प्रशस्त आहे. त्यात गुरुवार हा शुभ दिवस आल्याने सायंकाळी साडेपाच ते साडेसात हा सोने-चांदी खरेदीसाठी उत्तम वेळ राहील. गणेशमहाराज जोशी, पुरोहित.
बातम्या आणखी आहेत...