आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणुकीचा आरोप, अायटीआयची मान्यता सांगून दिले ‘व्होकेशनल’चे शिक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील राठी नगरमध्ये असलेल्या स्नेहदीप व्होकेशनल कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांपूर्वी प्रवेश घेताना संस्थेने आयटीआयची मान्यता असल्याचे सांगून प्रत्यक्षात व्होकेशनलचे शिक्षण दिले. या ठिकाणी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुणपत्रिका प्रमाणपत्राच्या आधारे शिकाऊ उमेदवारी किंवा पुढील शिक्षण मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे विद्यार्थी स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. ५) संस्थाध्यक्षाला हार घालून निषेध नोंदवला तसेच कार्यालयाला कुलूप ठोकले आणि पोलिस ठाण्यात आणले होते.
या महाविद्यालयात २०१३ मध्ये जवळपास १८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. या वेळी संस्थेकडून विद्यार्थ्याला आयटीआय असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्येकी २०, ३०, ३५, ४० हजार अशा प्रकारे शुल्क भरुन प्रवेश केला. त्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवताना व्होकेशनलचे शिक्षण देण्यात आले. दरम्यान, एप्रिल २०१६ मध्ये विद्यार्थ्यांच्या परिक्षा झाल्या आणि गुणपत्रिका आल्यात. या गुणपत्रिका घेऊन विद्यार्थी शासकिय आयटीआयमधील बीटीआरआय कार्यालयात पोहचले. या कार्यालयात आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नोंदणी करून त्यांना जागेच्या उपलब्धतेनुसार, शिकाऊ उमेदवारीसाठी (अॅप्रेन्टशिप) पाठवले जाते. मात्र या ठिकाणी सदर विद्यार्थ्यांना पात्र ठरत नसल्याचे सांगून परत केले. तसेच एका विद्यार्थ्यांला पालिटेक्नीकसाठी प्रवेश मिळाला नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. या सर्व प्रकरणात प्रत्येक विद्यार्थ्यांचे तीन वर्षे खर्च झाले आहेत. पैसे गेले आहे मात्र आता नोकरी, शिकाऊ उमेदवारी किंवा पुढील शिक्षणासाठी त्रास होत आहे. यावरून आमचा विश्वासघात झाला, संस्थेने फसवणूक केली असा आरोप करून विद्यार्थ्यांनी विद्यार्थी स्वाभिमानकडे तक्रार केली. त्यामुळे विद्यार्थी स्वाभिमानचे अनुप अग्रवाल, अभिजीत देशमुख अन्य कार्यकर्ते या सोमवारी (दि. ५) महाविद्यालयात पोहचले. त्यांनी संस्थाध्यक्ष विष्णू खंडारे यांच्यासोबत चर्चा केली मात्र समाधानकारक उत्तरे मिळाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी खंडारे यांची पूजा करून त्यांना हार घातले तसेच त्यांना गाडगेनगर पोलिस ठाण्यात आणले होते. मात्र हे प्रकरण विद्यार्थी संस्थाचालकात समझोता झाल्याचे सांगण्यात येते आमच्याकडे गुन्हा नोंद नाही, असे पोलिसांनी सांगितले.
संस्थाध्यक्षाला एक महिन्याची मुदत दिली
^आम्हीतक्रारदेण्यासाठी गाडगेनगर पोलिस ठाण्यात गेलेा होतो. मात्र संस्थाध्यक्ष विष्णूपंत खंडारे यांनी आमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत होते. त्यामुळे त्यांना एक महिन्याची मुदत दिली आहे. त्यामुळे तूर्तास तक्रार दाखल केली नाही. पुढील निर्णय लवकरच जाहीर करु’’ एकविद्यार्थी.

तक्रार मागे घेतली
^शहरातीलराठीनगरमध्ये असलेल्या स्नेहदीप व्होकेशनल कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारे काही विद्यार्थी सोमवारी तक्रार घेऊन आमच्याकडे पोलिस ठाण्यात आले होते. त्यांनी तक्रार द्यायची असे सांगितले होते मात्र काही वेळानंतर त्यांनी तक्रार मागे घेत असून, कोणतीही तक्रार नसल्याचे आम्हाला सांगितले आहे.’’
कैलाशपुंडकर, ठाणेदार, गाडगेनगर.

प्रवेश घेतवेळीच विद्यार्थ्यांना सांगितले
^आम्हीप्रवेशदेतेवेळीच प्रत्येक विद्यार्थ्यांला आयटीआय नसून आयटीआय समकक्ष असल्याबाबत माहिती दिली होती. तसेच आमच्याकडे शासनाच्या संबंधित विभागाची परवानगी आहे. मात्र, तरीही विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी किंवा शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहे.’’
विष्णुपंतखंडारे, संस्थाध्यक्ष.
बातम्या आणखी आहेत...