आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य केंद्रात भरते मुलांची अंगणवाडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घाटलाडकी - येथील अंगणवाडीला इमारत नसल्यामुळे अंगणवाडीत येणाऱ्या मुलांना आरोग्य केंद्रात विद्येचे दान दिल्या जात आहे. आरोग्य केंद्राच्या समोरच पाण्याचे डबके साचले असल्यामुळे अंगणवाडीत येणाऱ्या चिमुकल्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

गावाच्या लोकसंख्येचा विचार करता येथे अकरा अंगणवाडी केंद्र आहेत, परंतु केवळ चारच अंगणवाडी केंद्रांना इमारती असल्याने एका अंगणवाडीत दोन केंद्र करून मुले बसवण्यात येतात. १३८ २०३ या अंगणवाडी केंद्राला इमारतच नाही. त्यामुळे या अंगणवाडी केंद्रांची मुले आरोग्य उपकेंद्रात बसवली जातात. गेल्या कित्येक दिवसांपासून या मुलांना आरोग्य उपकेंद्रात बसवल्या जात आहे. दोन्ही अंगणवाडी केंद्रांमध्ये ५० च्या वर विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. ज्ञानार्जनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना बाय १० च्या खोलीत बसवण्यात येते. पालकांची त्यासाठी ना नाही, परंतु विशेष म्हणून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य उपकेंद्रासमोरच घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात शिक्षणाचे धडे घेणाऱ्या चिमुकल्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांसाठी करावी लागली सोय
भाड्यानेखोली मिळत नसल्याने आम्हाला विद्यार्थ्यांसाठी ही सोय करावी लागली. गटविकास अधिकारी यांच्याकडे याबाबत वारंवार विचारणा केली असता, यासाठी आणखी एक वर्ष लागू शकते, असे सांगण्यात आले आहे. लताफरकाळे, परीक्षक,घाटलाडकी

एकाअंगणवाडी केंद्राला मंजुरी
^येथीलग्रामपंचायतीने सर्व अंगणवाडी केंद्रांसाठी प्रस्ताव पाठवला आहे. यापैकी एका अंगणवाडी केंद्रासाठी मंजुरी मिळाली आहे. अशोकउईके, सरपंच.

इमारतनसल्याने पर्यायी व्यवस्था
^इमारतीकमी असल्यामुळे ही पर्यायी सोय केली आहे. सर्व इमारतींसाठी हेड ऑफिसला माहिती दिली आहे. यापैकी एका इमारतीचे ई-टेंडरिंग झाले आहे. जयश्रीकपूर, बालविकासअधिकारी, चांदूर बाजार.

बातम्या आणखी आहेत...