आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य विभागच ‘आजारी’, रिक्त जागा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव रेल्वे - मानवीजीवन सुदृढ राहण्यासाठी आरोग्याचे वेगळेच महत्त्व आहे. निरामयी आरोग्य अबाधित राखण्यासाठी रुग्णालयातून मिळणारी आरोग्य सेवा त्यासाठी आवश्यक मानली जाते. मात्र, तालुक्यातील आरोग्य विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. ग्रामीण रुग्णालयात नऊ तर प्राथमिक आरोग्य केंद्रात २६ पदे रिक्त आहेत. त्यामुळे इतर अधिकारी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. रिक्त पदांची भरती लवकरात लवकर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

आरोग्य विभागातील रिक्त पदांचा रुग्णसेवेवर मोठा परिणाम होत अाहे. वैद्यकीय अधीक्षक हे पद तर गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांवर कामाचा दुहेरी ताण पडत आहे. हीच अवस्था इतर अधिकारी कर्मचारी यांची आहे. याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. याबाबत रुग्णांकडून वारंवार ओरड होत आहे. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांची दोन पदे, सहायक अधीक्षक, दंत शल्यचिकित्सक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कक्ष सेवक, दंत सहायक ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत, तर प्रयोगशाळा सहायक या प्रसूती रजेवर गेल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरीत मंजूर २८ पदांपैकी नऊ पदे रिक्त आहेत.

पगारहोत नाहीत वेळेवर : तळेगावदशासर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या तीन वर्षांपासून कनिष्ठ लिपिक हे पद खाली आहे. त्यामुळे येथे कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्याचे मासिक वेतन इतर कार्यालयीन कामे वेळेवर होत नाहीत.

तीन कामांसाठी लिपिक मात्र एकच
ग्रामीणरुग्णालयातील सहायक अधीक्षक एका कनिष्ठ लिपिकाचा अतिरिक्त प्रभार दुसऱ्या कनिष्ठ लिपिकाकडे असल्याने या लिपिकाला एकंदर तीन पदांचा प्रभार सांभाळावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे, असे मत येथील अधिकारी कर्मचारी यांनी व्यक्त केले आहे.

चार प्राथमिक आरोग्य केंद्रात २६ पदे रिक्त
तालुक्यामध्येनिंबोली, तळेगाव दशासर, मंगरुळ दस्तगीर अंजनसिंगी येथे चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तळेगाव दशासर येथील केंद्रात वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स परिचराचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. अंजनसिंगीच्या केंद्रात आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वाहनचालक, परिचर, एल. एच. व्ही., स्टाफ पर्स ही पदे रिकामी आहेत. मंगरुळ दस्तगीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, वाहनचालक, स्टाफ नर्स यांचे प्रत्येकी एक पद खाली आहे, तर निंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक स्त्री आरोग्य सेवक, वाहनचालक, स्त्री परिचर, आरोग्य सेविकांचे पद प्रशासनाने अद्यापही भरलेले नाही. एकंदरीत चार आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी, स्त्री आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, कनिष्ठ सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वाहनचालक, परिचर, स्टाफ नर्स, कंत्राटी आरोग्य सेविका, असे एकंदर २६ पदे रिक्त आहेत.

रिक्त पदांचा अहवाल वरिष्ठांना पाठवला
तालुक्यातीलग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात वरिष्ठांना अवगत केले असून,सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. डॉ.सुभाष देशपांडे, तालुका आरोग्य अधिकारी, धामणगाव रेल्वे

निंबोली परिसरातील जनतेच्या आरोग्यासाठी २०११ साली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले.मात्र त्यानंतर कित्येक दिवसांपासून बांधकाम रखडल्याने चार वर्षे लोटूनही बांधकाम पूर्णत्वास गेले नाही. आता पुन्हा बांधकाम सुरू झाले असून ते केव्हा पूर्ण होते, याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.