आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ‘आपुलकी’चा आधार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शासनाकडून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून उभे राहणे, केवळ अशक्यच आहे. शासनाचे विविध योजनाचे परिणाम हे दूरगामी दिसणारे नाहीत. आर्थिक कणा मोडून पडलेल्या कुटूंबांना तातडीने रोजच्या कमाईचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी शासन नेमके इथेच कमी पडत आहे. परंतु, आपुलकीने हीच बाब हेऊन जिल्ह्यातील २६ कुटूंबांना जगण्यासाठी मदत म्हणून साधन उपलब्ध करुन दिले आहे. आपुलकीने आत्मविश्वास अभियानाच्या माध्यमातून मोडलेल्या २६ कुटूंबांना खांब उभे करुन दिले आहे.

आत्महत्या केलेल्या बळीराजाच्या कुटूंबाला समाजात सन्मानाने जगता यावे, त्याचा उदरनिर्वाह व्हावा या उद्देशाने या कुटूंबांना पीठगिरणी, शिवणयंत्र शेवयाची मशीन असे साहित्य देऊन आर्थिक मदत केली आहे. १७ कुटूंबाला २२ हजारांची पीठगिरणी, कुटूंबाला शिवण यंत्र आणि कुटूंबांना शेवयाची मशीन भेट म्हणून दिली आहे. आत्मविश्वास अभियानांतर्गत ज्यांना खरोखरीच जगण्यासाठी साधन असलेल्या आपुलकीने जिल्ह्यातील ३५ कुटूंबांची निवड केली आहे. यामध्ये २६ कुटूंबांना ही मदत केली आहे. याशिवाय मुलांच्या शिक्षणासाठी कुटूंबाला आर्थिक मदतही केली आहे. त्याचसोबतच बाहेरगावी राहणाऱ्या मुलांचा वसतीगृहाचा खर्च देखील केला आहे. आपुलकीने केलेल्या या मदतीमुळे जिल्ह्यातील २६ कुटूंब आर्थिकदृष्ट्या उभे राहिले आहेत.

मदत म्हणून काय ? : आत्महत्याकेलेल्या कास्तकाराच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह व्हावा, त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षण व्हावे यासाठी आपुलकीचे प्रकाश साबळे यांनी जिल्ह्यातील ३५ कुटू्ंबाची निवड केली आहे. ज्या कुटूंबांना खरोखरीच गरज आहे, अशांचीच निवड या मदतीसाठी करण्यात आली आहे.

आठ वर्षांपूर्वी रोवली मुहूर्तमेढ
^आत्महत्याकेलेल्याशेतकऱ्यांच्या कुटूंबाला सन्मानाने जगण्यासाठी त्यांना आर्थिक मदत केली जावी, याची मुहूर्तमेढ आठ वर्षापूर्वी राेवली. त्यानंतर ही चळवळ व्यापक बनली आहे. प्रकाश साबळे, ‘आपुलकी’.

सन्मानाने जगत आहे
कुटूंबाला जगण्यासाठी साधन उपलब्ध करुन देण्यापर्यंतच आपुलकी थांबत नाही. विशेष म्हणजे, एक महिन्यानंतर त्या कुटूंबाला भेट देऊन उदरनिर्वाह सुरळित सुरु आहे किंवा नाही, याचीही विचारणा केली जाते. दरम्यान, आपुलकीच्या या आर्थिक मदतीमुळे कुटूंबाला आर्थिक पाठबळ तर मिळालेच आहे, शिवाय दररोज या माध्यमातून त्यांना काहीना काही पैसे मागे शिल्लक राहत आहे. आपुलकीमुळे समाजात सन्मानाने जगण्याचे धाडस मिळाल्याच्या प्रतिक्रिया या कुटूंबांनी दै. ‘दिव्यमराठी’शी बोलताना दिल्या.