आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात गगनचुंबी इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - एकरुपविकास नियंत्रण नियमावलीवर महापालिकेच्या आमसभेत शिक्कामोर्तब केल्याने शहरात गगनचुंबी इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या नवीन नियमावलीमुळे इमारतींची उंची १८ मीटरवरून ५० मीटरपर्यंत म्हणजेच तब्बल १५ ते १७ मजल्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे नागरिकांना कमी किमंतीत घरे उपलब्ध होणार असली तरी महापालिकेच्या उत्पन्नात मात्र घट होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र शासनाने वर्ग महापालिकेकरिता एकरुप विकास नियंत्रण नियमावली तयार केली आहे. नागरी क्षेत्राचा झपाट्याने विकास होत असताना चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसअाय), हस्तांतरणीय विकास अधिकार (टीडीआर) तसेच िवविध जमीन वापर तसेच व्यवस्थेचे नियमनासाेबत संतुलीत विकास होणे गरजेचे आहे. शहराचे वाढती नागरिकीकरण, लोकसंख्या, शहराचा नियंत्रित विकास, नागरिकांना शैक्षणिक सेवा, आरोग्य सेवा, प्राथमिक सुविधा, आग प्रतिबंधन सेवा यामध्ये सुधारणा होणे आवश्यक झाले आहे. वाढती शहरीकरणामुळे होणारी असुविधा लक्षात घेता बिल्डर्स, विकासकांना सवलती देवून नागरिकांना दिलासा देणे आवश्यक होते. त्यामुळे अमरावतीसह राज्यातील चौदा वर्ग महापालिकेसाठी २० सप्टेंबर २०१६ रोजी शासनाने या नियमावलीस मंजूरी प्रदान केली आहे. कमी जागेत अधिकाधिक नागरिकांना घरे देण्याचा प्रयत्न विकासकाकडून केल्या जातो. मात्र, विविध परवानगी घेण्याचे अधिकार पूर्वी मनपा प्रशासनाकडे असल्याने अडवणुकीच्या प्रकारात वाढ झाली होती.
बातम्या आणखी आहेत...