आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादासाहेबांच्या आठवणींना उजाळा ; शहरातील संस्था, संघटनांतर्फे श्रद्धांजली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अमरावतीचा नावलौकिक वाढवणारे, बिहार आणि केरळचे माजी राज्यपाल दिवंगत दादासाहेब उपाख्य रा. सू. गवई यांना शहरातील विविध संस्था, संघटना, शाळा-महाविद्यालयांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात अाली. याप्रसंगी प्रमुख अतिथींनी दादासाहेबांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या अाठवणींना उजाळा दिला.
रामपुरीकॅम्प आश्रम, नित्यानंद दरबार : रामपुरीकॅम्प अाश्रम नित्यानंद दरबारतर्फे आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमाला प्रकाश मिराणी, करमचंद खत्री, हरगुनदास तालवानी, अनिल सीरवानी, माेहनलाल अाहूजा, रमेश रुपेजा, गुरमुख दास तारवानी, श्रीचंद तेजवानी अादी उपस्थित होते.
मार्क्सवादीकम्युनिस्ट पक्ष : मार्क्सवादीकम्युनिस्ट पक्षातर्फे नुकतीच श्रद्धांजली अर्पण करण्यात अाली. दादासाहेब गवई यांचे नेतृत्त्व बाबासाहेब अांबेडकर यांनी दीक्षाभूमीवर घेतलेल्या बाैद्ध धम्मदीक्षा समारंभापासून उदयाला अाले हाेते. दादासाहेबांनी अमरावतीच नव्हे तर संपूर्ण विदर्भात माेठी जनचळवळ उभी केल्याचे मान्यवरांनी सांिगतले.कार्यक्रमाला राज्य कमिटीचे सचिव मंडळ सदस्य उदयन शर्मा, जिल्हा सचिव सुभाष पांडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

जनतादल : जनतादलातर्फे अायाेजित श्रद्धांजली सभेला माजी अामदार जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. पांडुरंग ढाेले, सरचिटणीस अॅड. नंदेश अंबाडकर, जिल्हाध्यक्ष डाॅ. देवेंद्र शेरेकर यांच्यासह माेहन खंडारे, धर्मराज वरघट, सुरेश मेहरे, सुरेश माेहाेकार, छाया झाडे, मंदा पाचकवडे, रमेश खाेडे, सचिन ढगे, प्रदीप कांडलकर, शेख इस्माईल, अंबादास हरणे अादींची उपस्थिती हाेती.

‘लायन्सइंद्रपुरी’तर्फे नमन : दादासाहेबांनालाॅयन्स इंद्रपुरीतर्फे अादरांजली अर्पण करून त्यांच्या अाठवणींना उजाळा देण्यात अाला. डाॅ. गाेविंद कासट, डाॅ. रामदेव सिकची, डाॅ. रवींद्र कासट, रुद्रपालसिंग ठाकूर, सुनील चाैधरी, डाॅ. प्रदीप नांदगावकर, कमल शर्मा, अाेम जयस्वाल, मुरली खिलरानी, विरभान माेटवानी, प्रशांत देशमुख, रवि चाैधरी अादींनी शोक संवेदना व्यक्त केली.
श्रीगजानन महाराज हायस्कूल : श्रीगजानन महाराज हायस्कूल ज्युनियर काॅलेजतर्फे संस्थेच्या संचालिका कुसुम राऊत, प्रा.प्रदीप शेवतकर, विवेक इंगळे, माेहन इंगळे, रजनी अामले, गजानन खलाेरकर, विलास बिडकर, पी.टी. मुंदाणे, एस.डी.वानखडे यांनी आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाला पालक, िशक्षक, िशक्षकेतर कर्मचारी माेठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...