आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहपालांच्या दंडेलशाहीला लगाम, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा अन्नत्याग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदगावखंडेश्वर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी वसतिगृहामधील गैरसाेयींना कंटाळून गुरुवारी अन्नत्याग, तर युवा सेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन आंदोलन करण्यात आले. याची दखल घेत सहाय्यक उपायुक्तांनी १५ ऑगस्टपर्यंत वसतिगृह नवीन इमारतीत स्थानांतरीत करण्याचे आश्वासन दिले.
मुलांच्या वसतिगृहाची इमारत अतिशय जीर्ण झाली असून नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे पूर्ण इमारतीमध्ये पाणी साचले होते. त्यातच वसतिगृह प्रशासनाकडूनही मुलांना पुरेशा सोयी देण्यात येत नाहीत. त्यामुळे वसतिगृहातील मुलांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, याची दखल घेत युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गुरुवारी शहरात आेले सहाय्यक उपायुक्त डी. डी. फिस्के यांनी १५ ऑगस्टपूर्वी वसतिगृह नवीन इमारतीमध्ये स्थानांतरीत करण्याचे लेखी आश्वासन या वेळी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. आंदोलनादरम्यान येथील तहसीलदार ठाणेदार यांनी भेट दिली.
येथीलप्रियदर्शनी मुलींच्या वसतिगृहातील मुलींना गृहपालाने वसतिगृहाबाहेर काढल्याची घटना गुरुवारी घडली. घटनास्थळी भेट दिल्यानंतर समाज कल्याणच्या सहाय्यक उपायुक्तांनी गृहपालांची चांगलीच कानउघाडणी केली असून गृहपालांवर कारवाई करण्याचे आश्वासन युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
येथील प्रियदर्शनी मुलींच्या वसतिगृहात प्रवेशास पात्र ठरलेल्या मुलींची नावे ऑनलाईन यादीत तांत्रिक अडचणींमुळे समाविष्ट झाली नाहीत, ही तांत्रिक अडचण समजून घेताच गृहपाल पी. आर. कलाने यांनी मुलींना वसतिगृहातून बाहेर काढले. यासंबंधी युवा सेनेने तक्रार दाखल केल्यानंतर समाजकल्याणचे सहाय्यक उपायुक्त डी. डी. फिस्के यांनी वसतिगृह गाठून घडलेल्या प्रकाराबद्दल मुलींकडून माहिती घेतली तसेच युवा सेनेचे प्रकाश मारोटकर यांनी गृहपालाविरोधात दिलेल्या तक्रारीची शहानिशा करून गृहपाल कलाने यांना मुख्यालयी हजर राहण्याची तंबी दिली. गृहपालावर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन उपायुक्तांनी युवा सेनेला दिले.

या वेळी मनोज मानवतकर, योगेश िझमटे, क्रिष्णा कापडे, शिवशंकर श्यामसुंदर, आकाश काकडे, गौरव झिमटै, मनोज बनारसे, अक्षय बनारसे, योगेश काकडे, भोला वैरागडे, अतुल काकडे यांच्याह अनकेक पदािधकारी उपस्थित होते.

मुलांच्या वसतिगृहातील समस्यांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करताना पदाधिकारी .
आॅनलाईन यादीत नाव नसल्याने गृहपालाने मुलींचे सामान वसतिगृहाबाहेर फेकले.
बातम्या आणखी आहेत...