आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काठीने वार करून पत्नीची केली हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा - शेतात राखवाली करणाऱ्या पती-पत्नीतील वाद विकोपाला गेल्याने संतप्त पतीने काठीने पत्नीच्या डोक्यात वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तिवसा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सातरगाव शिवारात शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
मनती भोसले (३२) असे मृतक महिलेचे नाव असून,याप्रकरणी पोलिसांनी पती अनिस भोसले (३६ रा. सार्सी ) यास अटक केली आहे. मनती आणि अनिस हे दोघे पती-पत्नी सातरगाव येथील अमर पवार यांच्या शेतात राखणदार म्हणून कामाला होते. नेहमीच दोघांची भांडणे होत असत. शनिवारी झालेल्या भांडणात पती अनिसने रागाच्या भरात पत्नीला काठीने जबर मारहाण केली. त्यात मनतीच्या डोक्याला मानेला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास ठाणेदार अनिल लाड करत आहेत.