आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Alcohol Sales In Amravati City Anjangaon Surji

अंजनगाव सुर्जी तालुक्यात अवैध दारू विक्रीला उधाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजनगावसुर्जी- अंजनगाव सुर्जी तालुका हा अत्यंत अतिसंवेदनशील मानला जातो. कोणताही सण, उत्सव असल्यास गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करून सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली जाते. मात्र, काही दिवसांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून, पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
तालुक्यातील हिरापूर, चिंचोना, निमखेड बा. कारली, चौसाळा, लखाऊ, दहीगावसह इतर काही गावांत अवैध दारू विक्री सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दोन दिवसांअगोदर तालुक्यातील विहितगाव फाट्यावर एसपींच्या मार्गदर्शनाखाली पाच लाखांवर दारूसाठा पकडला होता. मग तालुका पोलिसांकडून अशा स्वरूपाची कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
पोलिसांनी करावी तत्काळ कारवाई
४४ गावांच्या सुव्यवस्थेचा भार ७३ पोलिसांच्या खांद्यावर : तालुक्यातएकूण ४४ गावे आहेत. या गावांमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा भार सध्या ७३ पोलिसांच्या खांद्यावर आहे. त्यामध्ये दोन एपीआय, तीन पीएसआय एका पीआयचा समावेश आहे.
शांतता समितीच्या बैठकीतही तक्रार : शांतता समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत काही नागरिकांनी याबाबत तक्रार केली होती. परंतु, अद्यापही त्यावर कारवाई करण्यात आली नाही, असा असा आरोप नागरिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

कारवाई सुरूच
- एक दीड महिन्यापूर्वी मी येथील पदभार सांभाळला आहे. तेव्हापासून रोज अवैध धंद्यांवर कारवाई सुरू आहे. याशिवाय कुणी माहिती दिल्यास तेथेही ताबडतोब कारवाई केली जाईल.''
मल्लिकार्जुन इंगळे, ठाणेदार,पोलिस स्टेशन, अंजनगाव सुर्जी.
विक्री बंद व्हावी
- दारूमुळे अल्पवयीन मुले वाम मार्गाला लागली आहेत.दारूच्या सेवनामुळे कित्येक गोरगरिबांचे संसार उद््ध्वस्त झाले होत आहेत. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणारी अवैध दारूची विक्री ताबडतोब बंद व्हायला हवी.''
विकास येवले, नागरिक.
अन्यथा पोलिस प्रशासनाविरोधात मोर्चा
- भंडारज येथे दोन वर्षांपूर्वी दारूचे दुकान बंद केले. परंतु, गावासह परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. ही दारू विक्री बंद केल्यास पोलिस प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्यात येईल.''
नीलेश राक्षसक, सामाजिक कार्यकर्ता.