आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध वाहतूक मस्त, पोलिस सुस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती शहरातील अवैध वाहतुक - Divya Marathi
अमरावती शहरातील अवैध वाहतुक
दर्यापूर- शहरात बेशिस्त वाहतुकीने कळस गाठल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी वाहने, आॅटोचालकांच्या मनमानीमुळे सामान्य नागरिक वेठीस धरल्या जात आहे. अनियंत्रित वाहतुकीमुळे शहरातील मुख्य मार्गांवर अपघात होऊन एखाद्याचा जीव जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
शहरात बसस्थानक, गांधी चौक, जयस्तंभ चौक, शेतकरी सदन, कृषी उत्पन्न बाजार समिती, बुटी चौक ही प्रमुख बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतूनच प्रमुख मार्ग गेलेले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरून सतत वाहनांची ये-जा असते. दरम्यान, या प्रमुख मार्गांवर पार्किंगची कुठेच व्यवस्था नसल्यामुळे अवैध वाहतूक करणारी वाहने, आॅटो, दुचाक्या, मालवाहू वाहने वाटेल तिथे मनमानी उभी केली जातात.
प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना विशिष्ट थांबे नसल्यामुळे काळी-पिवळी, आॅटोमध्ये प्रवासी मिळवण्यासाठी ही वाहने एकदम येऊन मधेच उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. शहरात यापूर्वी अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अनेक अपघात झाले आहेत. यात प्रवाशांचे जीवही गेले आहेत. या प्रमुख चौकांत पार्किंगची सोय उपलब्ध नसल्यामुळे अस्ताव्यस्त वाहने तासंतास उभी केली जातात.

नगरपालिका झोपेत
शहरातीलमुख्य बाजारपेठेत पार्किंगची सोय नसल्यामुळे वाहने नेमकी कुठे उभी करावी, असा प्रश्न वाहनचालकांना पडतो. शहरात िदवसेंदिवस वाहनांची संख्या प्रचंड वाढत आहे. परंतु, शहरातील मुख्य रस्त्यांवर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे शहाणपण अद्यापही पालिकेला सुचत नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. पालिकेचे पार्किंगच्या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे.

बसस्थानकासमोर कहर
बसस्थानकासमोरमोठ्या प्रमाणात विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. यात हातगाड्यांचाही माेठ्या प्रमाणात समावेश आहे. यामुळे येथे सतत नागरिकांची वर्दळ असते. त्यातच बसस्थानकातील प्रवाशांची सतत गर्दी राहते. त्यातच प्रवासी मिळवण्यासाठी येथे काळी-पिवळी, आॅटोचालकांची मनमानी असून, वाटेल तेथे वाहने उभी केली जातात.
दर्यापूर शहरात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे ठिकठिकाणी वाहने उभी असतात.
शहरातील मुख्य मार्गांवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश संबंधितांना देणार आहे. तसेच आपल्या कर्तव्यात हयगय करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनीही वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अमोलगायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी, दर्यापूर.
पोलिसांचे होतेय दुर्लक्ष
शहरातीलप्रमुख रस्त्यांवर वाहतूक पोलिस उभे असताना त्यांच्या डोळ्यासमोर वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. पोलिसांच्या डोळ्यादेखत कुठेही वाहने उभी केली जातात. अवैध वाहतूकदार वाहने प्रवाशांनी गच्च भरून पोलिसांच्या डोळ्यादेखत भरधाव धावतात. परंतु, पोलिस याकडे डोळेझाक करतात,असा आरोप नागरिकांनी केला आहे.
दर्यापूर शहरातील विविध ठिकाणी वर्दळीच्या मार्गावर अशी बेशिस्त वाहतूक असून रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त वाहने उभी केली जाते.

खासगी वाहनांचा धुमाकूळ
वर्दळीच्यािठकाणी खासगी वाहनांचा कमालीचा धुमाकूळ आहे. फुटपाथवरून चालायला जागा नाही. पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. मनोजतायडे, नागरिक.
बनोसा दुर्लक्षित रस्ता
वर्दळीच्यारस्त्यांवर वाहने वाटेल तेथे उभी असतात. बनोसा परिसरात तीन ते चार शाळा असल्याने हजारो विद्यार्थी वाहतुकीच्या कोंडीत अडकतात. येथे पोलिसांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. राजेंद्रगायगोले, शिक्षक.
समस्या जीवघेणी ठरतेय
भरबाजारपेठेतखरेदीसाठी येणाऱ्या महिला, नागरिकांना कोण, कधी, कशी धडक देईल याचा नेम राहिला नाही. या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. अभयगावंडे, नागरिक.
कामचुकार पोलिस
वाहतुकीलाशिस्त लावणारे पोलिस चौकाचौकांत गप्पा किंवा मोबाइलवर व्यस्त असतात. पोलिसांच्या कामचुकारपणामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. दिलीपवानखडे, नागरिक, दर्यापूर.