आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळलेल्या वृक्षांच्या हर्राशीवर हिरव्या झाडांची अवैध कत्तल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा - अचलपूर तहसीलअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील अनेक वृक्षांची अवैधरित्या कटाई केली जात आहे. नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रार करूनही साबांविचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने वृक्षतोड करणाऱ्या टोळीशी त्यांचे ‘अर्थ’पूर्ण व्यवहार होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
अचलपूर तालुक्यातील हरम टवलार मार्गावर अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्या टोळीला काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या मार्गावरील शंभरपेक्षा जास्त बाभळी कडूलिंबाच्या झाडांची कटाई केली असताना साबांविच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती नसल्याने ही बाब संशयास्पद मानली जात आहे.

दहा नोव्हेंबर रोजी टवलार येथील युवराज चित्रकार, छोटू् पाटील अन्य एका युवकाने हिरव्या झाडांची कत्तल करणाऱ्या टोळीतील एका सदस्याला पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्यातील दोन चाेरट्यांनी महिंद्रा पिकअप ऑटो घेऊन पळ काढला होता. पथ्रोट पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून दीपक शेंद्रे याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून वृक्ष तोड करणारी आधुनिक मशीन जप्त करण्यात आली होती.

तालुक्यातील साबांविच्या अनेक रस्त्यांवरील हिरव्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असून याकडे कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे बोलल्या जात आहे. अनेक ठिकाणी वाढलेल्यास वृक्षांचा हर्रास करणे आवश्यक असताना कर्मचाऱ्यांकडून ती परस्पर विकली जात आहेत. वृ़क्षतोड करणारे साबांवितील काही कर्मचाऱ्यांसाेबत अर्थपूर्ण व्यवहार करीत वाढलेल्या झाडांच्या तोडीसाठी नावापुरते रीतसर परवानगी मागतात. या वाढलेल्या झाडांच्या परवानगीवर अनेक हिरव्या झाडांची कटाई करून त्यातून लाखो रुपये कमवत आहेत. नियमाप्रमाणे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या वाळलेल्या झाडांचा हर्रास करण्याची प्रक्रिया करणे आवश्यक आहे, परंतु ठरलेल्या काही लाकूड व्यावसायिकांना हर्रासाची माहिती देऊन त्यांच्यापैकी काहींशी हर्रासाची बोली लावून हा हर्रास ‘मॅनेज’ केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ही बाब गंभीर असून या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहेे.
कर्मचाऱ्यांना दिले आहेत निर्देश
^रस्त्याच्याकडेला असणाऱ्या झाडांच्या सुरक्षिततेसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली असते. या मार्गावरील झालेल्या वृक्षतोडीबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. भविष्यात अशी वृक्षतोड होऊ नये म्हण्ून कर्मचाऱ्यांना तसे निर्देश देण्यात आले आहेत. आय.आय. खान, उपविभागीय अभियंता, अचलपूर.

‘तो’ लिपिक चर्चेत
साबांवि अंतर्गतवृक्षतोड हर्रास करण्यासाठी नियुक्त लिपिक चर्चेत असून वाळलेल्या झाडांच्या हर्रासात मर्जीतील व्यापाऱ्यांना परवानगी दिली जाते. यामध्ये वाळलेल्या झाडांसह हिरवी झाडे तोडण्याचाही छुपा करार होते. यासाठी या लिपिकासोबत ‘अर्थ’पूर्ण व्यवहार होत असून अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचेही बोलल्या जात आहे.