आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर आजार शस्त्रक्रिया शहरातच माफक दरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - हृदयरोग,कर्करोग आणि मेंदू या आजारांसंबंधित अत्यंत महागड्या शस्त्रक्रिया शहरातच आता माफक दरात होणार आहे. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) या ठिकाणी या महागड्या शस्त्रक्रिया होणार आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या मागील बाजूस सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या फेज-२ चे काम अंतिम टप्प्यात असून, इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे.

दरम्यान, बांधकाम जरी पूर्ण झाले असले, तरी वीजजोडणीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. कॅथलॅब, टूडी इको ब्रॅक थेरपी (कर्करोग उपचार) एमआरआय, सिटी स्कॅन अशा अत्याधुनिक अद्ययावत सुविधा या ठिकाणी राहणार आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयात हृदयरोग, कर्करोग आणि मेंदूशी निगडित उपचार शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला लाखांवर खर्च करावा लागतो. ज्या रुग्णांना इतक्या मोठ्या प्रमाणावर खर्च परवडत नाही, अशांसाठी शहरातच या महागड्या सुविधा अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विदर्भासह मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे २०१० मध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामाचा शुभारंभ करण्यात आला.

लोकप्रतिनिधींनी घ्यावा पाठपुरावा
सुपरस्पेशालिटी रुग्णालय फेज-२ च्या इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. इलेक्ट्रिफिकेशनचे काम करण्यात येत आहे. अत्याधुनिक अद्ययावत उपकरणानंतर हे रुग्णालय नागरिकांसाठी खुले होईल. परंतु, इतका कोट्यवधी रुपयांचा खर्च करून मनुष्यबळाअभावी काही उपयोगाचे राहणार नाही. जोपर्यंत शासन हवे तेवढे कर्मचाऱ्यांची भरती करणार नाही, तोपर्यंत इतकी मोठी इमारत केवळ शोसाठी राहील, असे सूत्रांनी सांगितले. सध्या सुपर स्पेशालिटी फेज-१ रुग्णालयातही बहुतांश कर्मचारी हे कंत्राट पद्धतीने काम करीत आहे. पायाभूत सुविधांसोबतच जोपर्यंत शासन मनुष्यबळाची पूर्तता करणार नाही, तोपर्यंत हा सगळा देखावा राहील. यासाठी लोकप्रतिनिधी यांनी मनुष्यबळासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

फेज-२ मध्ये काय असेल
रुग्णालयात असतील या अद्ययावत सुविधा
¾१०० खाटांचीसुविधा
¾एमआरआय,सिटीस्कॅन कर्करोग थेरपी
¾पॅथोलॉजी,आेपीडी,कॅथलॅब रक्तपेढी
¾४८तज्ज्ञडॉक्टर, ३५८ कर्मचारी, ३७ वैद्यकीय अधीक्षक २७३ इतर कर्मचारी
हृदयशस्त्रक्रिया (कार्डिआेलॉजी, कार्डियाक सर्जरी)
कर्करोग उपचार शस्त्रक्रिया (ऑन्कोलॉजी ऑन्कोसर्जरी)
मेंदूवरील शस्त्रक्रिया ( न्युरोलॉजी न्युरोसर्जरी)