आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Important Documents Seized In Case Of Chitransh Techn Limit

राठी अन् भटकरच्या घरांची झडती, चित्रांश प्रकरणातील महत्त्वाचे दस्तऐवज जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- एलईडीच्या माध्यमातून शेकडो व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या चित्रांश टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमीटेडच्या संचालकासह शहरात चित्रांशची फ्रान्चायसी घेणारे गोपालकृष्ण नारायणदास राठी (५६) आणि संजय रामभाऊ भटकर (४१) यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. शनिवारी (दि. १९) या दोघांच्याही घरांची झडती घेऊन महत्वाचे दस्ताऐवज जप्त करण्यात आले.
चित्रांशचा संचालक सुधिन्द्र माथूर याला पोलिसांनी मध्यप्रदेशातील कटनी येथून ताब्यात घेऊन अटक केली तर राठी अाणि भटकर या दोघांना अमरावतीमधून अटक केली आहे. शहरातील व्यापाऱ्यांसोबत या दोघांनी काय व्यवहार केलेत, यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांच्याही घरातून चित्रांशच्या संदर्भातील दस्ताऐवज तसेच शहरातच असलेल्या भटकरच्या एका प्रतिष्ठानामधून संगणक जप्त केला आहे. संगणकामध्ये किंवा दस्तऐवजामध्ये काही आवश्यक माहिती पुढे येते का? याचा शोध पोलिस घेत आहे.
दरम्यान सुधिन्द्र माथूर हा नागपूरला राहत होता. शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक नागपूरला गेले होते. त्याचे घर नागपूर पोलिसांनी पुर्वीच सील केले आहे.तसेच त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्यांचा शोध पोलिसांनी घेतला असता ते मिळून आले नाही, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश अणे यांनी दिली आहे.