आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In October, Orange Festivel Will Oragnise In Varud

ऑक्टोबरमध्ये वरूडला होणार संत्रा महोत्सव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, या हेतूने मोर्शीचे आमदार डॉ.अनिल बोंडे, कृषी विभाग आणि कृषिमित्र यांच्या संयुक्त सहकार्याने वरूड येथे संत्रामहोत्सवाचे आयोजन केले आहे. ते ऑक्टोबर २०१५ पर्यंत राज्यस्तरीय कृषी आणि संत्रामहोत्सवाचे आयोजन वरूड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात केले आहे.

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस ऑक्टोंबरला सकाळी ११ वाजता महोत्सवाचे उदघाटन करणार आहेत. या महोत्सवाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, केन्द्रीय मंत्री हंसराज अहिर, कृषी मंत्री एकनाथ खडसे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषी राज्य मंत्री राम शिंदे, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आदिवासी मंत्री विष्णु सावरा, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, पालकमंत्री प्रविण पोटे, गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यासह अनेक मंत्री खासदार आमदार उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी कळवले आहे. शेतकऱ्यांना चार दिवस विविध तंत्रज्ञानाच्या माहितीची मेजवानी या महोत्सवातून मिळणार आहे,अशी माहिती मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.

केन्द्राकरीता मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार
वरूडला संत्रा प्रक्रिया केन्द्र स्थापन झाले तर निश्चितच संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल. प्रक्रिया केन्द्र स्थापन करण्याकरीता मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली डॉ.अनिल बोंडे, आमदार मोर्शी

संत्रा उत्पादक पट्ट्यात नाही प्रक्रिया केन्द्र
विदर्भाचाकॅलीफोर्नीया म्हणून परिचित असलेल्या संत्राउत्पादक पट्ट्यातच संत्रा प्रक्रिया केन्द्र नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागतोय. या भागात प्रक्रिया केन्द्र असते तर शेतकऱ्यांच्या मालाला स्थानिक बाजारपेठेसह अन्य बाजारपेठ उपलब्ध झाली असती. प्रक्रिया केलेला संत्रा देशविदेशात निर्यात करण्याची सुविधा उपलब्ध झाली असती. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासही मदत झाली असती. वरूड आणि मोर्शी भागात या पुर्वी संत्रा प्रक्रिया केन्द्र स्थापन केले होते. काही कारणास्तव या भागात प्रक्रिया केन्द्र विकसीत होऊ शकले नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घेता या भागात ही सुविधा स्थापन करण्यासाठी आता लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे.