आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचन प्रकल्पांना आहे ‘ओव्हर फ्लो’ची आस : १४ पाणी वापर संस्थानांही बसणार फटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड- तालुक्यातील १० सिंचन प्रकल्पांपैकी बेलसावंगी तांत्रिदृष्ट्या सदोष असल्याने त्यात जलसंचय होत नाही. उर्वरित प्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा असला तरी गतवर्षीच्या तुलनेत तो कमी आहे. तालुक्यातील धरणांची एकंदर अवस्था पाहता त्यांनाही ‘ओव्हर फ्लो’ची आस लागल्याचे दिसत आहे.
सद्यस्थितीत नागठाणा धरणात सर्वाधिक म्हणजेच ६५ टक्के, तर पांढरी धरणात सर्वात कमी म्हणजेच १३ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. तालुक्यातील सर्वांत मोठा प्रकल्प शेकदरी मध्यम प्रकल्प म्हणून गणला जातो. या प्रकल्पात ३२ टक्के, पुसली प्रकल्पात ५० टक्के, वाई प्रकल्पात ४० टक्के, सातनूर प्रकल्पात १४ टक्के, जामगाव प्रकल्पात २३ टक्के, नागठाणा प्रकल्पात ६५ टक्के, जमालपूर प्रकल्पात ६० टक्के, लोणी धवलगिरी प्रकल्पात ४८ टक्के, पंढरीमध्ये १३ टक्के, बेलसावंगी प्रकल्प कोरडा, याव्यतिरिक्त पाकनाला, नागठाणा-२ या प्रकल्पांमध्ये जलसंचय सुरू आहे. भेंमडी, झटामझिरी, दाभी, पंढरी (मध्यम), बहादा आणि पवनी मध्यम प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पावर १४ पाणी वापर संस्था असून, संत्रा, मोसंबीसह रब्बीच्या सिंचनाकरिता या प्रकल्पातील जलसाठा महत्त्वाची भूमिका बजावतो. तालुक्यात सिंचनाची सुविधा असल्याने बागायती पिकांसह संत्रा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

मात्र यंदा आवश्यकतेपेक्षा कमी पाऊस पडल्याने ‘ओव्हर फ्लो’ची स्थिती पहायला मिळाली नाही. मागील वर्षीच्या पावसाळ्यात तालुक्यातील नागठाणा, शेकदरी प्रकल्प अाेसंडून वाहत होते. अर्धा पावसाळा झाल्यावरही दमदार पाऊस जिल्ह्यात कोसळला नाही. पिकालासुद्धा पावसाची नितांत आवश्यकता आहे. सिंचन प्रकल्पांनाही पावसाची आस लागली आहे. याबाबत तालुक्यातील शेतकरी नागरिक यांनी चिंता व्यक्त केली अाहे.

अन्यथाजलसंकट : यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने जलस्तर वाढू शकला नाही. येणाऱ्या काळात समाधानकारक पाऊस पडल्यास जलस्तर वाढू शकतो अन्यथा जलसंकट ओढवू शकते.
नागरिकांचासवाल, ओव्हर फ्लो कधी? : समाधानकारकपाऊस पडल्याचा परिणाम जलसाठ्यांवर झाला आहे. जुलै महिन्याचा दुसरा पंधरवाडा सोडता जून महिन्यापासून पाऊस नाही. त्यामुळे सिचंन प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’होणार कधी असा प्रश्न तालुक्यातील नागरिक एकमेकांना करीत आहेत.

पेयजल साठा राखीव ठेवावा
यावर्षी पावासाचे प्रमाण नसल्यातच जमा आहे. त्यामुळे आज शहराला तीन दिवसांआड पाणी मिळते, ते पुढील काळात तीन दिवसही मिळणे अवघड होणार आहे. त्यामुळे धरणातील जलसाठा राखीव ठेवणे आवश्यक आहे. रामकृष्णवानखडे, नागरिक.

रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता
शेकदरीधरणातून आम्हाला पाणी मिळते. त्यावरच गहू रब्बीची पिके घेतली जातात. या वर्षी धरणाची पातळी वाढल्यामुळे रब्बीचा हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. शशिभूषणउमेकर, शेतकरी,टेंंभुरखेडा.

शेतातून उत्पादन घेणे झाले कठीण
^पावसाचीपरिस्थिती अशीच राहिली तर धरणात असलेला सध्याचा साठा लक्षात घेता भीषण समस्येला तोंड द्यावे लागेल. संत्र्यासाठी गव्हासाठी शेकदरी धरणातून पाणी मिळत होते, परंतु या वर्षी रब्बीचे उत्पादन घेणे कठीण होईल असे वाटते. प्रमोदपाटील, शेतकरी,गव्हाणकुंड.

अद्याप उघडले नाहीत दरवाजे
यंदापुरेसा पाऊस झाल्यामुळे वरुड तालुक्याप्रमाणेच अप्पर वर्धा प्रकल्पाची दारेसुद्घा उघडली नाहीत. पावसाअभावी पर्यटकांनीही पाठ फिरवली असून, सद्यस्थितीत तालुक्यातील सर्व प्रकल्पांत सरासरी १७ टक्के साठा उरला आहे.
यंदा पावसाने दडी मारल्याने पाक प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे.इतर धरणांचीसुद्धा हीच स्थिती आहे.
बातम्या आणखी आहेत...