आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचन विहीर बांधकामास राज्य शासनाची मुदतवाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - धडकसिंचन विहीर योजनेतील जिल्ह्याला मिळालेल्या उद्दिष्टांमधील तब्बल हजारांवर विहिरी पूर्ण झाल्या आहेत. मात्र, उर्वरित विहिरींच्या बांधकामासह काहींचे अंतिम धनादेश वितरित करण्याबाबत स्पष्ट धोरण नव्हते. यासंदर्भात शासनाने नुकताच एक निर्णय घेतला असून, आता शिल्लक विहिरी पूर्ण करण्यासाठी वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. शासनाने घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये नक्कीच समाधान व्यक्त केल्या जाणार आहे.

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांनी कळस गाठला आहे. परिणामी, मार्च महनि्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ येथे भेट दिली होती. या भेटीत त्यांनी जूनअखेर संपूर्ण धडक सिंचनच्या विहिरी पूर्ण कराव्या, असा अल्टिमेटम जिल्हा प्रशासनाला दिला होता. या वेळी यासाठी जवळपास ४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने वारंवार मीटिंग, बैठका, सभा घेऊन विहिरी पूर्ण करण्यावर भर दिला. यामुळे जवळपास एक हजार ५५ विहिरी पूर्णत्वास आल्या आहेत. यातील ३४४ विहिरी आताही प्रगतिपथावर असून, ७३८ विहिरींच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवातच करण्यात आली नाही. त्यात काही प्रगतिपथावरील विहिरींचा अंतिम धनादेश देण्यासाठी मुदत संपली आहे. परिणामी, पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांची गोची झाली आहे.
यासंदर्भात शासनानेच निर्णय घेतला असून, धडक सिंचन विहिरींच्या कामांना ३० जून २०१६ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे शेतकरी धडक सिंचनमधील विहिरींचे बांधकाम करू शकणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याला मिळालेले उद्दिष्टही पूर्ण होईल. या निर्णयाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्येही आता समाधान व्यक्त केल्या जात आहे.

जिपच्या अभियंत्यांचा करणार सत्कार
विहिरीबांधकामासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती. त्या अनुषंगाने अभियंत्यांनी चांगलाच पुढाकार घेतला होता. यात उत्कृष्ट काम करणाऱ्या अभियंत्यांचा तालुका तसेच जिल्हास्तरावर सत्कार करण्यात येणार आहे. हा सत्कार ते १५ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.

मार्चनंतर जिल्ह्यामध्ये अत्यंत गतिमान पद्धतीने धडक सिंचन विहिरींची कामे पूर्ण केली. तरीसुद्धा अर्ध्याअधिक विहिरींची कामे आजही प्रलंबित आहे. ह्या विहिरी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ होणे गरजेचे होते. त्या अनुषंगाने आम्ही मार्गदर्शन मागवले होते. मात्र, शासनानेच निर्णय घेतल्यामुळे आता शंभर टक्के उद्दिष्ट प्राप्त करू. आमचे नियोजन झाले आहे. डॉ.मल्लनिाथ कलशेट्टी, सीईओ.

अंतिम धनादेश देण्याचे टेन्शन झाले खल्लास
विहिरींचेबांधकाम पूर्ण करताना शेतकऱ्यांना अनंत अडचणी गेल्या. या अडचणींमुळे बराच विलंब झाल्यानंतर विहिरींचे काम पूर्ण केले. मात्र, मुदत संपल्यामुळे पैसे देताना गटविकास अधिकाऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. हे टेन्शन कसे दूर करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला होता. आता शासनामुळे हा तिढा सुटला आहे.

वणी परिसरात विहिरींचे काम केल्यानंतरही पाणी येणे अवघड आहे. परिणामी, शेतकरी विहिरी करताना बराच विचार करतात. या प्रकारामुळे सव्वातीनशे विहिरींची कामे अद्यापही सुरू झाली नाहीत. त्यातही शेतकरी बोअर करण्याची परवानगी मागत आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयाकडे मार्गदर्शन मागवले आहे.
बातम्या आणखी आहेत...